आजपासून पुढील ११८ दिवस ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून चमकणार!

मित्रानो, ज्योतिष शास्त्रामध्ये गुरु ग्रहाला वैभव, ऐश्वर्य, समृद्धी, संपत्ती, ज्ञान आणि सुखाचा कारक मानले जाते. तर आता तब्बल १२ वर्षांनंतर गुरु ग्रह उलटी चाल चालणार आहे. म्हणजेच गुरु आता वक्री होणार आहे. जेव्हा एखादा ग्रह वक्री चाल चालतो तेव्हा त्याची हालचाल खूप वेगाने होते. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तसेच गुरूंच्या कृपेने त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत जाणून घेऊया.

मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी गुरूची वक्री चाल फायदेशीर ठरू शकते. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीत गोचर करत असताना वक्री होणार आहे. त्यामुळे 5 सप्टेंबरपासून पुढील ११८ दिवस तुमच्यासाठी शुभ ठरू शकतात. या काळात तुमचा प्रेमविवाह होऊ शकतो आणि विवाहासाठी प्रस्तावही येऊ शकतात. तर विवाहित लोकांना मुले होऊ शकतात. तसेच उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात आणि बेरोजगारांना नवीन नोकऱ्या मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायातही तुमची प्रगती होऊ शकते.

मिथुन रास
गुरूची उलटी चाल मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. कारण तुमच्या उत्पन्नाच्या ठिकाणी गुरु वक्री होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. सुखाच्या साधनांमध्ये वाढ होऊ शकते. तसेच तुमच्या विवाहाचा योग जुळून येऊ शकतो. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच, विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. मित्र आणि नातेवाईकांशी चांगले संबंध राहू शकतात.

कर्क रास
गुरूची वक्री चाल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीतील कर्म स्थानी गुरु ग्रह वक्री होणार आहे. त्यामुळे 5 सप्टेंबरपासून येणारे ११८ दिवस तुमच्यासाठी शुभ ठरू शकतात. त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात.मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. तसेच, या दरम्यान तुमचा व्यवसायातील नफा वाढू शकतो.

Leave a Comment