मित्रानो, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आज 6 आणि उद्या 7 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. तथापि, गृहस्थ जीवनात असलेले लोकं आज 6 सप्टेंबर रोजीच जन्माष्टमी साजरी करतील. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्रीकृष्णाला भगवान विष्णूचा आठवा अवतार मानले जाते. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीशी संबंधित 5 चुका करणे टाळावे. असे करणाऱ्यांना नेहमी पैशाची कमतरता भासते.
जन्माष्टमीला तुळशीची पूजा केल्यास लक्षात ठेवा संध्याकाळी तुळशीच्या रोपाला अजिबात स्पर्श करू नका. देवी लक्ष्मी स्वतः तुळशीमध्ये वास करते आणि संध्याकाळी स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते.
तुळशीची पूजा करताना महिलांनी केस कधीही मोकळे ठेवू नयेत. तुळशीपूजेच्या वेळी केस बांधून ठेवा.
श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण करायची असतील तर ती ओरबडून तोडू नयेत. सर्वप्रथम तुळशीला नमस्कार करावा. यानंतर त्याची पाने हलक्या हाताने तोडून घ्या.
तुळशीची पूजा केल्यानंतर किंवा तुळशीला जल अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा करण्यास विसरू नका. तुळशीपूजेनंतर तिची किमान तीन वेळा प्रदक्षिणा करा.
काही लोक तुळशीची चुनरी झाकल्यानंतर बदलत नाहीत, तर इतर देवतांप्रमाणे तुळशीची वस्त्रेही बदलली पाहिजेत. तुळशीला नवीन चुनरी अर्पण करण्यासाठी जन्माष्टमी हा खूप शुभ दिवस असू शकतो.
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 06 सप्टेंबर रोजी दुपारी 03:37 वाजता सुरू होईल आणि 07 सप्टेंबर रोजी दुपारी 04:14 वाजता समाप्त होईल. यावेळी 6 आणि 7 सप्टेंबर असे दोन दिवस जन्माष्टमी साजरी होणार असल्याचे ज्योतिषी सांगतात. गृहस्थ आज 6 सप्टेंबर रोजी जन्माष्टमी साजरी करतील, तर वैष्णव संप्रदाय 7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमी साजरी करतील.