शुक्रवारी संध्याकाळी करा हे महाउपाय! देवी लक्ष्मीची होईल कृपा, नशिबाची उघडतील दारं

मित्रानो, हिंदू धर्मात शुक्रवार हा दिवस लक्ष्मीचा दिवस मानला जातो. लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणतात. या दिवशी पूर्ण विधीपूर्वक उपवास आणि पूजा केल्यानं भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो.

तसेच घरात सुख-शांती नांदते. शुक्रवारी उपवास केल्याने लोकांचे आर्थिक प्रश्नही दूर होतात आणि घर धनधान्याने भरून जाते. अनेक लोकांकडे भरपूर पैसा येतो, पण तो त्यांच्या खिशात राहत नाही. या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करावे.

शुक्रवारी कोणते उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होऊ शकतात आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते. या 3 उपायांनी देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी पांढर्‍या वस्तूंचे दान करावे. जाणकारांच्या मते, धनाची देवी लक्ष्मीला पांढरा रंग खूप आवडतो आणि यामुळेच पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो.

असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते आणि खिसा नेहमी पैशांनी भरलेला असतो. साखर, पांढरे वस्त्र, कापूर, दूध, दही इत्यादी पांढर्‍या वस्तूंचे शुक्रवारी दान करावे.

शुक्रवारी “ॐ शुम शुक्राय नमः” या “ॐ हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम् सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं” या मंत्राचा अवश्य जप करा. याशिवाय, तुम्ही तुमच्या घरातील सर्व दिवे संध्याकाळी चालू करावेत. असे केल्याने देवी लक्ष्मी घरात येते आणि लोकांचे भाग्य उजळते, असे मानले जाते.शुक्रवारी देवी लक्ष्मीला मोगरा, अत्तर अर्पण करा. कामात प्रगती होण्यासाठी गुलाबाचा अत्तर लावावा.

देवी लक्ष्मीसमोर कवड्याचे अत्तर अर्पण केल्याने मानसिक शांती मिळते. चंदनाचा अत्तर अर्पण केल्याने सौभाग्य वाढते. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी जोडप्यांनी शुक्रवारी श्रृंगाराच्या सोळा वस्तू अर्पण कराव्यात. रोज घरात अत्तर ठेवल्याने काम आणि व्यवसायात वाढ होते.

Leave a Comment