स्वामींची ही एक अशी चमत्कारिक आणि प्रभावशाली सेवा जे तुम्हाला जगातील सर्व सुख देईल!

मित्रांनो श्री स्वामी समर्थांची एकच सेवा तुमच्या दररोजच्या सेवेमध्ये आणखी करू शकता ज्या मुले तुमच्या मनातील व सर्व इच्छा आकांशा व स्वप्ने पूर्ण करेन.मित्रांनो तुमची हि स्वामींवर श्रद्धा असेल तुम्ही हि स्वामींची मनोभावे पूजा करत असाल तर त्या सेवेमध्ये फक्त हि एक सेवा अवश्य करा.

स्वामींची हि एकाच सेवा आहे जी तुमची इच्छा पूर्ण करू शकते तुम्हाला सर्व काही मिळवून देऊ शकते. आणि हि सेवा करण्याकरिता श्री स्वामींजवळ दिवसातून एकदा अगदी कोणत्याही वेळेस रात्री असो किंवा दिवसा स्वामींसमोर शांत बसायचे आहे जिथे तुम्हाला घरात एकांत मिळेल मग ते देवघर असो किंवा तुमचा घरातील एखादा शांत कोपरा असो.

शांत बसल्यानंतर डोळे झाकून अगदी हळुवारपणे
श्री स्वामी समर्थ ! श्री स्वामी समर्थ !
असा शांतपणे स्वामींचा जाप करा आणि तुम्ही म्हणाल हा किती वेळा करायचा आहे. तर मित्रानो हा जप वेळ न पाहता व न मोजता तुम्हाला जितका वेळ करता येईल तितका वेळ श्री स्वामी समर्थ! ह्या जपाचा नामस्मरण करा.

हे जाप करत असताना कोणतेही विचार मनात अनु नका कसल्याही चिंता मनामध्ये अनु देऊ नका. कसलाही विचार मनामध्ये अनु नका आणि मनात विहार येत असतील तर स्वामींना अथवा स्वामींचे नामस्मरण करा ते विचार यायचे नक्की थांबतील. तुम्ही जे बोलताय त्या आवाजावर लक्ष द्या. आपल्या श्वास वर लक्ष द्या किंवा तुम्ही स्वामी समर्थांचा जाप कसा करत आहत त्या ओठांकडे लक्ष द्यायला शिका म्हणजे तुमच्या मनात दुसरं काहीच येणार नाही.

रात्रीच्या वेळी जेवण झाल्यावर आणि झोपेच्या आधी थोडा निवांत वेळ असतो आपल्या दिवसाची कामे आवरून आपण झोपायला जाईचा आधीच वेळेत आपण स्वामींचे नामस्मरन करा. एखादी अगरबत्ती लावावी जेणेकरून वातावरण प्रसन्न व सुगंधमय राहील अश्या वातावरणात स्वामींचे नामस्मरण केल्याने तुम्हाला सगळे डोक्यावरचे दिवसभराचे टेन्शन असो, काही त्रास असो तो सर्व निघून जाईल.

हे असे तुम्ही काही दिवस करा तुम्हाला तुमच्या मध्ये बदल दिसून येईल तुम्ही नेहमी आनंदी राहाल व तुम्हाला नेहमी पॉसिटीव्ह वाटेल. त्यामुळे तुमची सर्व काही कामे इच्छा असतील ती सर्व स्वामींच्या कृपेने पूर्ण होतील.

Leave a Comment