उद्या 2 सप्टेंबरपासून या राशीवर होईल दत्तगुरुकृपा! ‘या’ राशींचे लोक होणार श्रीमंत

आज सप्टेंबर महिन्यातील पहिला दिवस आहे. एक अत्यंत दुर्मिळ असा सुकर्म योग जुळून आला आहे. सप्टेंबर महिन्याभराचा कालावधी राशीचक्रातील सहा राशींच्या कुंडलीत सुकर्मा योग कायम असणार आहे. रक्षाबंधनाला शनी- गुरु युती जुळून आली होती तर चंद्र सुद्धा शनीच्या कुंभ राशीवर प्रभावी होता. या ग्रहसंगमाने सुकर्म योग जुळून आला आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार उद्या शनीदेव गुरूच्या शततारक नक्षत्रात प्रभावी असणार आहेत. शनीची मूळ स्थिती ही अद्यापही शतभिषा नक्षत्रातच आहे मात्र गोचर प्रभावामुळे गुरूच्या नक्षत्रातही शनी प्रभाव जाणवेल. ग्रहांच्या प्रभावामुळे आणि शुभ योगामुळे भगवान विष्णू सहा राशींच्या भाग्यात महत्त्वाचे बदल घडवून आणू शकतात. कोणत्या राशींना कसा लाभ होण्याची चिन्हे आहेत हे पाहूया …

पहिली राशी आहे मेष रास
उद्याचा शनिवार मेष राशीच्या लोकांसाठी नशिबाचे दार उघडणारा ठरू शकतो. अनेक अपूर्ण कामे नशिबाच्या मदतीने पूर्ण होतील. नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांचा मान वाढू शकतो. संपत्तीचे शुभ योग जुळून येऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यापारी वर्गाला दिवसभर कामात स्वतःला झोकून द्यावे लागेल पण त्याचा परिणाम हा अत्यंत लाभदायक दिसून येत आहे.

मिथुन रास
शनिवार मिथुन राशीच्या व्यक्तींना अचानक संपत्तीत वाढ घेऊन येऊ शकतो. भगवान विष्णूच्या कृपेने आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. व्यावसायिकांची मेहनत यशस्वी होईल. मान-सन्मान वाढू शकतो. प्रतिस्पर्ध्यांना खडतर स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांसाठी शनिवार आनंददायी ठरू शकतो. घरात आनंदाचे वातावरण असू शकते. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचे सहकार्य मिळेल. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. धार्मिक कार्यात रुची वाढेल. वडिलांशी संबंध चांगले राहतील. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकते. संवाद कौशल्य उत्कृष्ट असेल.

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी शनिवार लाभदायक ठरू शकतो. भगवान विष्णूच्या कृपेने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्ही सामाजिक उपक्रमात सहभागी होऊ शकता. मान-सन्मान वाढू शकतो. व्यवसायासाठी काही नवीन योजनांवर काम करू शकता. जे चांगला नफा देईल. उत्पन्न वाढवण्यासाठी कर्मचारी दुसऱ्या कंपनीत जाण्याचा विचार करू शकतात. नशिबाच्या सहकार्याने धनप्राप्ती होऊन सुख-समृद्धी लाभेल.

Leave a Comment