गणेश चतुर्थी येईपर्यंत रोज घरात या मंत्रांचा करा जप, मनातील सर्व मनोकामना होतील पूर्ण!

मित्रानो, दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव सुरु राहतो. असे मानले जाते की याच दिवशी विघ्नहर्ता, सुखकर्ता गणपतीचा जन्म झाला होता. दरवर्षी हा गणेशोत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या उत्सवाबद्दल जास्तीत जास्त धूम असते. चतुर्थीच्या दिवशी गणपती भक्त ढोल-ताशांच्या गजरात आपल्या घरी घेऊन येतात.

यानंतर घरात गणपतीला घरात विराजमान केले जाते. श्रद्धेनुसार लोक 5, 7 किंवा 9 दिवस घरी गणपती बसवतात. या दरम्यान त्यांची खूप सेवा केली जाते. पूजा केली जाते आणि त्यांचे आवडते नैवेद्य अर्पण केले जातात. गणपतीच्या पूजेत अक्षतांचे विशेष महत्त्व आहे. ज्यावेळी गणेशाला घरी आणले जाते त्यावेळी एक विशेष पूजेचं आयोजन केले जाते.

तर गणेश चतुर्थी ही यावर्षी 19 सप्टेंबर या दिवशी आहे. तर तुम्ही 19 तारीख येईपर्यंत रोज घरात या मंत्रांचा जप करायचा आहे यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील संकट दूर होऊन घरात भरभराट होईल. कधीही तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. तर तो मंत्र काहीसा असा आहे,

ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात
तर असा हा मंत्र दररोज तुम्ही बोलायचा आहे. गणेश चतुर्थी येईपर्यंत हा मंत्र जप जर तुम्ही केला तर नक्कीच तुमचे सर्व अडथळे दूर होतील. ज्या काही इच्छा अपूर्ण राहिलेली असेल तर ती नक्की पूर्ण होईल.

Leave a Comment