मित्रानो, व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल असणारा श्रावण महिना सुरू आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे. मराठी वर्षातील पौर्णिमांमध्ये श्रावण पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे. श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही म्हटले जाते. या दिवशी रक्षाबंधनाचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो.
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा ३० ऑगस्ट रोजीच साजरी करावी असे सांगितले जात आहे. यंदाच्या रक्षाबंधनाला भद्रा करण जुळून येत आहे. देशातील अनेक ठिकाणी भद्रा काळात शुभ कार्ये केली जात नाहीत. मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तो भद्रा करण असताना केला जात नाही.
रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी १०.५८ ते रात्री ९.०२ भद्रा करण आहे. महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल, असे सांगितले जात आहे. ३१ ऑगस्ट रोजी सूर्य मघा नक्षत्रातून पूर्वा नक्षत्रात प्रवेश करत आहे.
पूर्वा नक्षत्रात होत असलेला सूर्याचा प्रवेश अतिशय चांगला मानला जातो. पूर्वा नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे. सूर्य जेव्हा या नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा लोकांच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होईल. सूर्याच्या नक्षत्र गोचरामुळे ४ राशींना विशेष लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. कोणत्या राशींना अच्छे दिन येतील? जाणून घेऊयात.
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. सूर्याच्या पूर्वा नक्षत्रातील प्रवेश या राशींना सकारात्मक ठरू शकेल. कुटुंबात परस्पर सौहार्द वाढेल. वडील आणि मुलाचे नाते पूर्वीपेक्षा बरेच चांगले होईल. करिअरमध्ये विशेष यश मिळेल. यशाच्या पायऱ्या चढाल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला असेल. हा करार मोठा लाभदायक ठरू शकेल.
मिथुन राशीच्या व्यक्तींना आगामी काळात मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे. जो काही नवीन प्रकल्प सुरू करणार आहात, त्यात नक्कीच यश मिळेल. अचानक पैसे मिळू शकतात. व्यवसाय करत असाल, तर चांगला नफा मिळेल. काही लोक जे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांनाही फायदा होईल. एकापेक्षा जास्त स्त्रोताकडून पैसे मिळतील. सूर्याच्या आशीर्वादाने संपत्तीत वाढ होईल. प्रत्येक कामात यश मिळेल. मात्र, खर्चा कडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
कर्क राशीच्या व्यक्तींना जीवनात बरेच सकारात्मक बदल घडून येऊ शकेल. नोकरीसाठी कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेला बसणार असाल तर नक्कीच यश मिळेल. जे काही काम हातात घ्याल, त्याचा फायदा होईल. ही सुवर्णसंधी ठरू शकते. सावध राहून जे काही काम कठोर परिश्रमाने कराल त्यात अपेक्षित परिणाम मिळतील. रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा, केलेले काम खराब होऊ शकते.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आगामी काळ खूप फलदायी ठरू शकतो. व्यवसायात यश मिळेल. नशिबाची साथ मिळेल. समाजात स्थान निर्माण होईल. विशेष सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टी कराल. बॉसकडून प्रशंसा ऐकायला मिळेल. व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. करिअर सुधारेल. पुढे जाण्यासाठी काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. या निर्णयांमध्ये यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
सूर्य आताच्या घडीला स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत विराजमान आहे. सूर्याच्या या संक्रमणाला सिंह संक्रांती म्हटले जाते.