मित्रांनो दर सोमवारी करा स्वामींचे हे काम जीवनात कोणत्याच गोष्टीची कमी तुम्हाला पडणार नाही. मित्रांनो आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो भक्ती करतो तेव्हा एकेक दिवस खूप महत्त्वाचा असतो.वेगवेगळ्या वाराचे वेगवेगळे महत्व असते म्हणून आपण प्रत्येक वारी किंवा प्रत्येक दिवशी वेगवेगळी सेवा किंवा वेगवेगळे काम करू शकतो जेणेकरून स्वामी समर्थ हे आपल्यावर प्रसन्न होऊ शकतील.
मित्रांनो तुम्हाला माहित आहेच की सोमवारी महादेवाची पूजा भक्ती केली जाते. महादेवाची सेवा केली जाते कारण हा महादेवाचा वार मानला जातो आणि यादिवशी स्वामींची सेवा करूच आणि त्यासोबतच आपल्याला महादेवाच्या एका मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे.
स्वामींच्या सेवेमध्ये महादेवाची सेवा केली जाते म्हणून तुम्हाला दर सोमवारी फक्त २१ वेळा हा एक छोटासा सोपा मंत्र बोलायचा आहे. जर तुम्ही रोज स्वामींची सेवा करत असाल तर तुमच्या सेवेमध्ये दर सोमवारी हा एक मंत्र बोलू शकता.
आता हा मंत्र कोणता आहे तर मित्रांनो हा मंत्र खूप सोपा सरळ आहे पण खूप चमत्कारिक आहे. याने तुमच्या घरातील सगळी दुख संपून जाईल, अडचणी दूर होतील, संकट दूर होतील आणि ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील.तर हा मंत्र काही असा आहे.
ओम तत पुरुषाय विद्यहे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र:प्रचोदयात. मित्रांनो खूप सोपा सरळ मंत्र आहे आणि तुम्हाला जास्त वेळ बोलायचं नाही. मित्रांनो हा मंत्र तुम्हाला फक्त २१ वेळा बोलायचे आहे आणि तेही फक्त सोमवारच्या दिवशी बोलायचं आहे. सोमवारी हा मंत्र तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी बोलू शकता.
तुम्हाला जमल्यास तर सकाळीच बोला तुम्ही जेव्हा फ्रेश असता तेव्हा हा मंत्र बोला तर याचा शुभ प्रभाव जास्त पडेल. तर मित्रांनो दर सोमवारी या मंत्राचा जप करायला विसरू नका.