मित्रानो, मुलांचे लग्न वेळेत व्हावे, त्यांची नातवंडे आपण खेळवावी ही प्रत्येक सामान्य कुटुंबातील लोकांची इच्छा असते. मुलांनी योग्य वेळेत सेटल व्हावं लग्न करावं अशी पालकांची इच्छा असते.सध्या मुली मिळत नाहीत म्हणून अनेक तरूणांची लग्न रखडली आहेत.
नवरा मुलगा गुढग्याला बाशिंग बांधून तयार असला तरी लग्नाचे योग काही जुळत नाहीयेत. सुरूवातीला तर मुलाच्या लग्नाचा योग कधी आहे हे कुंडलीत पाहून तपासले पाहिजे. त्यानंतर मुली पाहणं आणि बोलणी करणं या गोष्टी केल्या पाहिजेत. या सगळ्या प्रक्रियेत योग कधी आहे, हे प्रत्येकाच्या तोंडातलं वाक्य असतं.
जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला सारखीच वेदना होत असेल आणि वय होऊनही त्यांचे अजून लग्न होत नसेल, तर लग्नातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी आणि लवकर लग्नाचे योग घडवण्यासाठी हे सोपे आणि प्रभावी उपाय केले पाहिजेत.
लग्नाचे वय होऊनही लग्न होत नाही. हळूहळू वृद्धत्व सुरू होते आणि जीवनसाथी मिळणे कठीण होते. अनेक वेळा लग्नात विविध अडथळे येतात. या समस्यांवर मात करण्यासाठी श्रावणातील सोमवारी करता येतील असे काही उपाय सांगण्यात आले आहेत. पाहुयात काय आहेत ते उपाय
कधी कधी लग्नासाठी स्थळ येऊनही लग्न होत नाही. कारण त्यासाठी तुमचे लग्नाचा योग आलेला नसतो.एखाद्याच्या आयुष्यात लग्न योग आलेलाच नसेल तर त्याला ती व्यक्तीही काही करु शकत नाही. त्यावर असंही एक सल्ला दिला जातो की, घरात कोणी लग्नाचं बाकी असेल तर त्यांचा विवाह आधी उरकून घ्यावा. त्यानंतर इच्छित वराचे लग्न होईल.
या समस्येवर महादेवांनी तोडगा दिला आहे. माता पार्वतीनेही भगवान शंकरांशी विवाह व्हावा म्हणून तपश्चर्या केली होती. त्यामुळेच त्यांना इच्छित वर प्राप्त झाला. तुमच्या घरातही कोणाचे लग्न होत नसेल तर महादेवांना अभिषेक करा.
महादेवांना काही पदार्थ विशेष प्रिय असतात. या पदार्थांचा त्यांना अभिषेक केल्यास ते प्रसन्न होतात असं मानलं जातं. येत्या श्रावणात महादेवांना एका खास पदार्थांचा अभिषेक केल्यास ते प्रसन्न होतील.
शास्त्रात असा उपाय दिलाय की, श्रावणातील एखाद्या सोमवारी कोणत्याही महादेवांच्या मंदिरात जा. सकाळी किंवा सायंकाळी दिवेलागणीच्या वेळीही तुम्ही हा उपाय करू शकता.
मंदिरात देवाची आराधना करून सध्याच्या मोसमात मिळणाऱ्या डाळिंबाचा अभिषेक महादेवांना अभिषेक करावा. अभिषेक करताना मनात महादेवांची आराधना करून इच्छित फळ प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करावी.
जर तुमच्या मुलीच्या लग्नात उशीर होत असेल तर शक्तीची साधना करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. यासाठी तुम्ही तुळशीदासजींनी रचलेले पार्वती मंगल रोज पठण करावे आणि खाली दिलेल्या मंत्राचा जप करावा.
हे गौरि शंकरार्धांगि यथा त्वं शंकरप्रिया। तथा मां कुरु कल्याणि कान्तकान्तां सुदुर्लभाम्।।
जर एखाद्या तरुण किंवा तरुणीच्या लग्नात अडथळा येत असेल तर त्यांचे लवकर लग्न होण्यासाठी प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची किमान 108 प्रदक्षिणा केली पाहिजे. यासह, शक्य असल्यास, वटवृक्ष, पिंपळ आणि केळीच्या झाडांना पाणी देऊन त्यांचे आशीर्वाद नक्कीच घ्यावेत.