मित्रानो, निज श्रावण मास सुरू असून, दुसरा श्रावणी सोमवार आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून तीळ वाहावे. विशेष म्हणजे याच दिवशी प्रदोष व्रत आहे. चंद्र धनु राशीत विराजमान असेल. दुसऱ्या श्रावणी सोमवारी अत्यंत शुभ मानले गेलेले ४ योग जुळून आले आहेत. त्यामुळे हा श्रावणी सोमवार सर्वोत्तम मानला गेला आहे.सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, सौभाग्य योग आणि आयुष्मान नावाचे शुभ योग जुळून येत आहेत. त्यामुळे श्रावणी सोमवारचे दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. यासोबतच उत्तराषाढा नक्षत्राचा प्रभावही दिवसभर राहणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या प्रभावामुळे आणि शुभ योगामुळे दुसरा श्रावणी सोमवार भगवान महादेवांच्या कृपेने ५ राशीच्या व्यक्तींना सौभाग्याचा दिवस असणार आहे. जीवनात प्रगतीची दिशा मिळेल. नशीब साथ देईल आणि काही ज्योतिषीय उपायांनी कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत होण्यास मदत मिळेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया या राशीबद्दल.
मेष राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी सोमवार अतिशय शुभ ठरू शकेल. करिअरमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील. जीवनात प्रगतीची नवी दिशा मिळेल. नोकरदार लोकांचे अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे भगवान शंकराच्या कृपेने पूर्ण होतील. मनाचा भार हलका होईल. नशिबाने साथ दिल्याने मनोकामना सोमवारी पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. अडथळे दूर करण्यासाठी सोमवारी व्रत करून शिवलिंगावर गौरी शंकर रुद्राक्ष अर्पण करा. सकाळ-संध्याकाळ शिवमंदिरात रुद्राक्षाच्या माळेने महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा.
कर्क राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी सोमवार लाभदायक ठरू शकेल. शुभ योगाच्या प्रभावामुळे आर्थिक, करिअरमध्ये खूप लाभ होण्याची शक्यता आहे. मन अध्यात्मिक कार्यात गुंतले जाईल. परोपकारासाठी काही पैसेही खर्च होतील. इतरांना मदत करण्यास तत्पर असाल, समाजात सन्मान वाढेल. भगवान शंकराच्या कृपेने सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने रखडलेली सरकारी कामे पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळू शकते. कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत होण्यासाठी सोमवारी पांढऱ्या रंगाचा समावेश असलेले वस्त्र परिधान करा. आईची सेवा करा. पांढऱ्या वस्तू दान करा.
सिंह राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी सोमवार शुभ ठरू शकेल. भगवान शिवाच्या कृपेने व्यवसायात चांगली वाढ होऊ शकेल. अडकलेले पैसे मिळू शकतील. मुलांची प्रगती पाहून मन प्रसन्न होईल. मनातील इच्छाही पूर्ण होतील. उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. तिन्हीसांजेला प्रदोष काळी भगवान शंकराचे यथाशक्ती नामस्मरण करा.
कन्या राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी सोमवार आनंददायी ठरू शकेल. भगवान शंकराच्या कृपेने संपत्तीत वाढ होण्याचे मार्ग सापडू शकतील. परदेशातील योजना यशस्वी होतील. नोकरदारांना अधिकार्यांचे सहकार्य मिळेल. मित्र आणि प्रियजनांसोबत उत्सवाच्या मूडमध्ये राहाल. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल. मार्गात येणारे अडथळे दूर होतील. व्यावसायिक प्रगतीसाठी सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा. यथाशक्ती ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.
मकर राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी सोमवार शुभ फलदायी ठरू शकेल. शुभ योगाच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी चांगले स्थान मिळेल. व्यावसायिकांना प्रवासातून लाभ होऊ शकतील. कुटुंबात शांतता आणि आनंद राहील. प्रिय जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जुनी गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. समाजात प्रतिष्ठा वाढेल. मित्रांने सूचवलेल्या योजनेमुळे फायदा होण्याची शक्यता आहे. शिवलिंगावर दूध, पाणी, दही, बेलपत्र, अक्षत, धतुरा, गंगाजल इत्यादी अर्पण करून पूजन करावे. शक्य असल्यास शिव चालिसाचा पठण किंवा श्रवण करावी.
ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवार हा चंद्राला समर्पित असल्याचे मानले जाते. तसेच सोमवार महादेव शिवशंकराचा वार मानला जातो. त्यामुळे महादेवांसह चंद्राची कृपा प्राप्त होऊ शकते. –