३ सप्टेंबरपर्यंत ‘या’ राशींच्या नशिबात राहणार लक्ष्मीकृपा!

मित्रानो, श्रावण महिन्यातील दुसरा आठवडा आजपासून सुरु होत आहे. रक्षाबंधन विशेष असा हा आठवडा अनेक शुभ राजयोग व ग्रह गोचारांनी परिपूर्ण असणार आहे. या आठवड्यात शनी व गुरु यांची अत्यंत दुर्मिळ युती तयार होत आहे. एवढंच नाही तर रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेला शनिदेव कुंभ राशीत जागृत झाल्याने १२ राशींच्या आयुष्यात काही ना काही बदल घडून येऊ शकतात.

याच आठवड्यात बुधादित्य राजयोग, अखंड साम्राज्य राजयोग सुद्धा जुळून येणार आहेत. शिवाय आठवड्याच्या शेवटी महिना बदलत असल्याने अनेक ग्रह गोचरासाठी सक्रिय असतील. महिन्याभरातील मरगळ झटकून तब्बल सात राशींच्या आयुष्याचा वेग वाढणार आहे. यामध्ये तुमचाही समावेश आहे का? तुमच्या राशीचे या आठवड्याचे भविष्य काय हे सविस्तर जाणून घेऊया.

मेष राशी
मेष राशीच्या मंडळींना जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर हा आठवडा त्यांच्यासाठी सोन्याहून पिवळे सुखाचे दिवस घेऊन येऊ शकतो. मंगळवार तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असणार आहे. प्रत्येक गोष्टीसाठी विचार व वेळ हा ताळमेळ नक्की साधून घ्या. तुमची इच्छापूर्ती होण्याचा हा कालावधी असणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आला आहात ती लवकरच पूर्ण होणार आहे. मात्र शेवटच्या टप्यात तुमच्या प्रयत्नांचा वेग सुद्धा वाढवावा लागले. मंगळवार आपल्यासाठी सुद्धा शुभ असणार आहे.

मिथुन राशी
तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी एखादी घटना घडणे अपेक्षित आहे. दिनांक २८, २९ या दोन दिवसांत आपण कितीही शांत राहण्याचा प्रयत्न केला तरी तसे होणार नाही. समोरून अशा काही गोष्टी येतील की आपला रागाचा पारा चढणारा असेल. व्यावसायिक वाढ व्हावी म्हणून ज्या जाहिरात माध्यमांचा वापर करणार आहात, ती फायद्याची असेल. नोकरदार वर्गाच्या कामातील गती वाढेल. आर्थिक नियोजन करा. भावंडांशी संवाद जपून करा.

कर्क राशी
षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. व्यवसायात जे चालले आहे ते चांगलेच आहे असे समजा. नोकरदार वर्गाने स्वत:हून कामकाजात कोणताही बदल करू नका. खर्च करताना विचार करा. या सगळ्यात सुखाची बाजू इतकीच की तुम्हाला जोडीदार महत्त्वाची साथ देईल. प्रकृतीबाबतीत हलगर्जीपणा टाळा.

सिंह राशी
आर्थिक व्यवहार करताना हुशारीने वागा. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करणे टाळा. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहिल्यास मानसिकता चांगली राहील. प्रकृतीची काळजी घ्या. दिनांक ३०, ३१ हे दोन दिवस शांत राहून सुवर्णमध्य साधा. कोणाला कुठलाही सल्ला देत बसू नका. स्पष्ट बोलल्यामुळे दुरावा येणार नाही याची काळजी घ्या. मैत्रीच्या नात्यात सलोखा वाढेल. मित्रांच्या साथीने आपण अनेक त्रास विसरून जाऊ शकता.

तूळ राशी
नारळी पौर्णिमेचा दिवस शुभदायक असेल. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त मोबदला मिळणार आहे. त्यामुळे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होईल हे निश्चित. नोकरदार वर्गाने समतोल साधावा. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. राजकीय क्षेत्रात नवीन कामाची सुरुवात होईल.

वृश्चिक राशी
दिनांक १ व २ आपल्यासाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. नशीब आपल्यावर मेहेरबान असणार आहे. धन लाभ होण्यासह नवीन कामाची सुरुवात होण्याची सुद्धा चिन्हे आहेत. सूर्य देव आपल्यावर प्रसन्न असणार आहेत.

धनु राशी
तुमच्या मनाचा कौल निश्चितच ऐकायला हवा. तुम्ही एखाद्या अशा स्थितीत अडकू शकता जिथून बाहेर पडण्याची किल्ली फक्त तुमच्याच मेंदूत असणार आहे. तुमचे हितचिंतक सुद्धा संभ्रमात असतील त्यामुळं कोणाचंही मत घेण्यापेक्षा तुमच्या मानाने सांगितल्याप्रमाणे निर्णय घ्या.

Leave a Comment