‘या’ राशींच्या भाग्यात येणार वादळ! हे 12 दिवस रहावे लागणार जपून

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-ताऱ्यांच्या हालचालीचा थेट परिणाम आपल्या राशींवर होत असतो. आता येत्या 25 ऑगस्टपासून 4 सप्टेंबरपर्यंत 5 ग्रह वक्र होणार आहेत, तर 4 ग्रह सरळमार्गी असतील.

याचा अनेक राशींवर विपरीत परिणाम होणार आहे. मात्र येणाऱ्या अडचणींवर उपाय केल्यास आपले कष्ट कमीदेखील होऊ शकते. 25 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत बुध ग्रह सिंह राशीत वक्र होणार आहे, तर शुक्र ग्रह 4 सप्टेंबरपासून 7 सप्टेंबरपर्यंत वक्रस्थितीत असेल. शनी ग्रह 18 जून ते 4 नोव्हेंबरपर्यंत वक्र असणार आहे. शिवाय राहू आणि केतूदेखील वक्र असतील.

मेष राशी
5 ग्रहांच्या वक्रस्थितीत आपल्याला आर्थिक चणचण भासेल. विवाह जुळण्यात अडचणी येतील. विवाहित दाम्पत्याच्या मुलांना शिक्षणासंबंधित अडचणींचा सामना करावा लागेल. आईलादेखील त्रास होऊ शकतो. शिवाय समाजात आपला मानसन्मान

वृषभ राशी
आपण अधिकारी किंवा कर्मचारी असाल तर आपल्याला कार्यालयीन अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आई-वडिलांनादेखील त्रास होण्याची शक्यता आहे. मुलांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. मुलांच्या प्रगतीत अडथळे येतील. भावंडांमधील संबंध चांगले राहतील.

मिथुन राशी
आपल्यासाठी हा काळ उत्तम असेल. आपल्याला धनलाभ होऊ शकतो, मात्र भाग्य अपेक्षेपेक्षा कमी साथ देईल. भावासोबतचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. मुलांकडून चांगलं सहकार्य मिळेल. मुलांना अभ्यासात यश मिळेल. आपल्या प्रकृतीत सुधारणा दिसून येईल. विवाह जुळण्याचा योग आहे. मात्र आपल्या जोडीदारासाठी हा काळ कष्टाचा असू शकतो. लहान-मोठ्या अपघाताची शक्यताही आहे. आपल्याकडे धन निश्चित येईल, मात्र त्यात कमतरता असेल.

सिंह राशी
5 ग्रह वक्र झाल्याने आपल्याला मानसिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो. आपल्या जोडीदारासाठीदेखील हा काळ कष्टाचा असेल. परिणामी वैवाहिक जीवनात अडचणी येतील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळू शकतं. भावासोबतचे संबंध मात्र तणावपूर्ण असतील.

कन्या राशी
आपल्या कोर्ट-कचेरीच्या कामांचा गुंता आणखी वाढेल, मात्र धनप्राप्तीचा योग आहे. परंतु आपल्या शत्रूंची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहे. शिवाय आपला अपघातही होऊ शकतो.

तूळ राशी
आपल्या लग्नात अनेक अडचणी येणार आहेत. शिवाय धनप्राप्तीतही बाधा येईल.
विवाहित दाम्पत्याला मुलांकडून चांगलं सहकार्य लाभणार नाही. मुलांना कष्टाचा सामना करावा लागेल. त्यांच्या अभ्यासात अडचणी येऊ शकतात. मात्र आपली कामकाजात प्रगती होऊ शकते.

वृश्चिक राशी
5 ग्रह वक्र होणार असल्याने आपलं नशीब उजळणार आहे.
परंतु कामकाजात आपला मानसन्मान ढासळण्याची शक्यता आहे. शिवाय आपल्या आई-वडिलांना कष्टाचा सामना करावा लागू शकतो. आपल्या वाट्याला सुखाचे क्षणदेखील कमी येणार आहेत आपल्याला आपलं भाग्य अपेक्षित साथ देणार नाही. एकाच वेळी आर्थिक लाभ आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. बहिणीसोबत वाद उद्भवू शकतो. शिवाय आपल्याला प्रकृतीसंबंधित अडचणींचा सामना करावा लागेल.

मकर राशी
5 ग्रहांच्या वक्रस्थितीत आपल्या अडचणींमध्ये कमालीची वाढ होणार आहे. मात्र आपल्या जोडीदाराला शारीरिक कष्टांपासून मुक्ती मिळू शकते. परंतु आईला मात्र या काळात कष्टाचा सामना करावा लागणार आहे. तर, समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल. आपण अविवाहित असाल तर विवाहासाठी चांगली स्थळं येतील. या राशीच्या व्यक्तींना बरीच शारीरिक कष्टाची कामं करावी लागणार आहेत. आपल्याला मानसिक त्रासाचा सामनाही करावा लागू शकतो. आपल्या जोडीदाराच्या शारीरिक अडचणी वाढू शकतात.

शिवाय आपल्या शत्रूंच्या संख्येतही वाढ होणार आहे. या सगळ्यात दूरच्या प्रवासाचा योग आहे.

Leave a Comment