दररोज ‘या’ जागेवर लावा दिवा! पैसा, सुख-समृद्धी नांदेल

मित्रानो,बहुतेक लोकांना आयुष्यात कधी ना कधी आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्या टाळण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात, पण यश मिळत नाही. कधी कधी वास्तुदोषांमुळे आर्थिक संकटही येऊ शकते.

अशा वेळी वास्तुशास्त्राचे काही नियम पाळल्यास घरातील आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. वास्तुशास्त्रात तुळशीची वनस्पती अत्यंत पवित्र मानली जाते. त्यामुळे वास्तू दोष दूर होतात. तुळशीचे काही उपाय करून तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ शकता.

आज आम्ही तुम्हाला तुळशीचा असाच एक उपाय सांगत आहोत, ज्याचा अवलंब केल्यानं घराकडे धन आकर्षित होते आणि रिकामी तिजोरीही भरली जाते. प्रत्येकाने आपल्या घरात तुळशीचे रोप लावलेच पाहिजे. वास्तुशास्त्रात तुळशीच्या रोपाला घरातील सुख-समृद्धी वाढवणारे मानले जाते. तुळशीचे रोप जेवढे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, तेवढेच महत्त्व वास्तु उपायांसाठीही आहे.

तुळशीचे रोप घरात ठेवल्यानं कुटुंबात सुख, शांती आणि आर्थिक समृद्धी येते. हे रोप लावल्यानं लक्ष्मीची कृपा होते. तुळशीचे रोप लावल्याने घरातील आर्थिक संकट दूर होते. मात्र, तुळशीचे रोप लावताना वास्तुशास्त्राचे काही नियम पाळले पाहिजेत. वास्तूनुसार तुळशीचे रोप योग्य दिशेला लावल्यानं तुमच्या समस्या दूर होऊ शकतात.

तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सर्व समस्या दूर होतात. ही वनस्पती कुटुंबाला दृष्ट लागण्यापासून वाचवते आणि आनंद आणि शांती वाढवते. तुळशीचे रोप घरामध्ये नेहमी पूर्व दिशेला लावावे. रोपे लावण्यासाठी ही दिशा उत्तम आहे.

जर कोणत्याही कारणाने हे शक्य नसेल तर तुळशीचे रोप बाल्कनीजवळ किंवा खिडकीजवळ उत्तर किंवा ईशान्येला ठेवता येते. तुळशीच्या रोपाजवळ शूज, चप्पल, झाडू, डस्टबिन कधीही ठेवू नका. तुळशीचे रोप योग्य दिशेला लावण्यासोबतच आर्थिक संकट दूर करण्यासाठी त्याच्याजवळ तुपाचा दिवा लावावा.

तुळशीच्या रोपाजवळ नियमितपणे तुपाचा दिवा लावल्यास घरामध्ये धनाचा वर्षाव होईल आणि देवी लक्ष्मीची कृपादृष्टी होईल. असे केल्याने घरात कधीही आर्थिक समस्या राहणार नाही आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. तुळशीचे रोप घरामध्ये सौभाग्य आणते आणि पैशाशी संबंधित समस्यांपासून संरक्षण करते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लोकांचे आरोग्य चांगले राहते.

Leave a Comment