ही कामे करत असताना कधीही रुद्राक्ष धारण करू नका! होतील वाईट परिणाम

मित्रांनो, आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये अनेक गोष्टींचे ज्ञान अवगत होते. म्हणजेच शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे उपाय नियम हे सांगितले गेलेले आहेत. रुद्राक्ष हा भगवान शिवाचा एक भाग मानला जातो. म्हणजेच अध्यात्मिक आणि दैवी शक्तीने परिपूर्ण असलेल्या रुद्राक्ष याला हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्व दिले गेलेले आहे. म्हणजेच रुद्राक्षाची जी काही उत्पत्ती झाली ती भगवान शिव यांच्या अश्रूंपासून झालेली आहे.

म्हणजेच जेव्हा देवी सतीने शरीर सोडल्यानंतर भगवान शिवांच्या रडण्याने पडलेले अश्रू होते ते अश्रू पृथ्वीवर अनेक ठिकाणी पडले आणि जेथे अश्रू पडले तेथे निसर्गाला रुद्राक्षाच्या रूपात एक चमत्कारिक घटक प्राप्त झाला. तर हाच रुद्राक्ष बरेच जण आपल्यापैकी परिधान देखील करीत असतात.

परंतु हे रुद्राक्ष परिधान करताना किंवा केल्यानंतर काही नियम आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. हे नियम तुम्ही पाळणे खूपच गरजेचे असते.बरेच जण हे भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी रुद्राक्ष परिधान करतात. तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशी काही कामे सांगणार आहे ही कामे तुम्ही रुद्राक्ष धारण केल्यानंतर अजिबात करायचे नाहीत.

रुद्राक्ष आपण धारण केल्यानंतर आपल्यापासून अनेक प्रकारच्या ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतात त्या दूर राहतात. तसेच जर तुम्ही आपल्या घरामध्ये रुद्राक्षाची नित्यनेमाने पूजा केली तर आपल्याला आर्थिक टंचाई देखील कोणती भासत नाही. तसेच धनधान्याची कमतरता ही आपल्या घरामध्ये जाणवत नाहीत.

परंतु अशा काही गोष्टी आहेत या गोष्टी रुद्राक्ष प्रधान केल्यानंतर अजिबात करायच्या नाहीत. जेणेकरून त्याचा विपरीत परिणाम देखील आपल्या जीवनावर होऊ शकतो.तर मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस अंतयात्रा किंवा स्मशानभूमीमध्ये जाता त्यावेळेस तुम्ही आपल्या रुद्राक्ष परिधान करायचा नाही. या गोष्टी करण्यापूर्वी तुम्ही रुद्राक्ष काढून ठेवायचे आहे.

जन्म आणि मृत्यूशी संबंधित ठिकाणी जर तुम्ही रुद्राक्ष परिधान केला तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्या जीवनावर होत असतात. त्यामुळे तुम्ही अंतयात्रा किंवा स्मशानभूमीमध्ये जेव्हा जात असाल त्यावेळेस तुम्ही रुद्राक्ष काढून ठेवणे खूपच गरजेचे आहे.तसेच तुम्ही रुद्राक्ष कधीही ज्या खोलीमध्ये मुलाचा जन्म झाला त्या खोलीमध्ये अजिबात परिधान करू नये.

हे जे बंधन आहे हे मुलाचे जात कर्म संस्कार पूर्ण झाल्यानंतर सांगते. त्यामुळे तुम्ही प्रसूतीच्या खोलीमध्ये कधीही रुद्राक्ष परिधान करू नये. तसेच आपण संध्याकाळी ज्या वेळेस झोपतो त्यावेळी झोपायच्या आधी रुद्राक्ष काढणे खूपच गरजेचे आहे.या वेळी शरीर दुर्बल आणि अशुद्ध असते. तसेच रुद्राक्ष मोडण्याची देखील भीती असते. त्यामुळे तुम्ही झोपण्याच्या आधी रुद्राक्ष काढणे गरजेचे आहे.

रुद्राक्ष उशाखाली ठेवल्यामुळे आपणाला आंतरिक शांती मिळते. तसेच जे लोक रुद्राक्ष धारण करतात त्यांनी तामसिक अन्न टाळायचे आहे. म्हणजेच तामसिक अन्न, दारू पिणे हे तुम्ही सोडायचे आहे. कारण हे शास्त्रांमध्ये योग्य मानले जात नाही. कारण जर तुम्ही रुद्राक्ष धारण केल्यानंतर तामसिक अन्न किंवा दारू पिली तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्या जीवनावर होऊ लागतो.

त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टींपासून आपल्याला दूर ठेवायचे आहे. जेणेकरून आपल्याला त्याचे कोणतेही नुकसान होणार नाही. म्हणजेच तुम्ही पहिल्यांदा या सर्व गोष्टींपासून स्वतःला दूर करायचे आहे आणि नंतरच रुद्राक्ष धारण करायचा आहे. जेणेकरून त्याचा लाभ आपल्याला प्राप्त होईल.

तसेच अनेक प्रकारच्या अशा मानवी क्रिया देखील असतात ज्यामध्ये शरीर हे अशुद्ध होते म्हणजे शारीरिक संबंध. त्यामुळे तुम्ही शारीरिक संबंध ठेवते वेळी रुद्राक्ष अजिबात परिधान करायचा नाही. तसेच महिलांनी मासिक पाळीच्या काळामध्ये रुद्राक्ष घालायचे नाही. कारण जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवताना तसेच महिलांनी मासिक पाळीच्या दरम्यान तसाच रुद्राक्ष परिधान केला तर अनेक प्रकारची संकटे वाईट परिणाम नुकसान आपणाला सहन करावे लागते.

त्यामुळे या गोष्टी करीत असताना तुम्ही अजिबात रुद्राक्ष धारण करायचा नाही. तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे ही कामे तुम्ही करत असताना रुद्राक्ष अजिबात परिधान करायचा नाही. कारण त्यामुळे मग वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतात. त्यामुळे तुम्ही ही कामे करत असताना रुद्राक्ष काढून ठेवायचा आहे. जेणेकरून त्याचा लाभ आपल्याला प्राप्त होईल.

Leave a Comment