मित्रानो, सनातन हिंदू धर्मामध्ये एकादशीचे विशेष असे महत्त्व आहे. त्यातही लोक श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी अधिक महत्त्वाची असते, असे मानतात. या दिवशी उपवास केल्याने भगवान शिव आणि विष्णू दोघांचीही भाविकांवर कृपा होते आणि भाविकांना दुप्पट फळ मिळते, असे मानले जाते.
तसेच पुत्रप्राप्तीची इच्छा ठेवून जो पूजा करतो त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे.वैद्यनाथ मंदिराचे पुजारी याबाबत सांगतात की, यावेळी पुत्रदा एकदशीचा उपवास हा 27 ऑगस्ट रोजी केला जाणार आहे. या दिवशी 6 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. या दिवशी हा एकादशीचा उपवास केल्याने भगवान शिव आणि विष्णू दोघांचीही भाविकांवर कृपा होते.
यावेळी पुत्रदा एकादशी मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु आणि मीन राशीच्या राशीच्या लोकांसाठी आनंददायी परिणाम देणारी आहे. या राशींच्या लोकांना काय फायदा होणार आहे, हे जाणून घेऊयात.
मेष राशी
या राशीच्या लोकांसाठी पुत्रदा एकादशी अतिशय शुभ असणार आहे. या राशीच्या लोक धार्मिक प्रवासाला जाऊ शकतात. अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. यासोबतच नशीबही उजळेल. तसेच मातेच्या तीर्थयात्रेचा योग असेल. भावाच्या आनंदात आनंद वाढ होईल. नवीन क्षेत्रात यश मिळेल. उपवासाच्या दिवशी शुभवार्ता मिळू शकते. मेष राशीच्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला केळी अर्पण करा. केळी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे.
वृषभ राशी
या राशीच्या लोकांसाठी ही एकादशी आनंददायी आहे. कर्मक्षेत्रात उन्नती होईल. उद्योगधंद्यात तेजी येऊ शकते. दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. भावाच्या कुटुंबात मंगलकार्य होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. न्यायालयीन वाद मिटणार आहेत. पुत्रदा एकादशीच्या दिवशी उपवास केल्यास फायदा होईल. पुत्रदा एकादशीच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला तुळशी अर्पण करावी.
सिंह राशी
या राशीच्या लोकांसाठी ही एकादशी खूप फायदेशीर ठरणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो.
यासोबतच थांबलेले पैसेही तुम्हाला मिळतील. व्यापार उद्योग चांगला चालेल. कृषी क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत प्रगती होईल.
चांगली बातमी मिळेल. मामाकडून सहकार्य मिळेल. कुठेतरी प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे फायदा होईल. सिंह राशीच्या लोकांनी भगवान पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला हरभरा आणि गूळ अर्पण करा.
कन्या राशी
या राशीतील लोकांसाठी एकादशीचा दिवच खूप सकारात्मक राहणार आहे. जर तुम्हाला जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी करायचे असेल तर पुत्रदा एकादशी तुमच्यासाठी सर्वात शुभ दिवस असेल. नोकरीत प्रगती होईल. कृषी क्षेत्रात यश मिळेल. एखाद्या नवीन अधिकाऱ्याकडून सहकार्य मिळेल. कन्या राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला श्रीफळ अर्पण करा.
धनु राशी
या राशीच्या लोकांसाठी पुत्रदा एकादशी खूप शुभदायक असणार आहे. धनु राशीच्या राशीच्या लोकांवर भगवान विष्णूचा सर्वाधिक आशीर्वाद असणार आहे. या राशीच्या लोकांचे नशीबही साथ देणार आहे. व्यवसायात पैसा मिळण्याची शक्यता आहे.
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादांचा वर्षाव होईल. नोकरीतही बढती मिळण्याची शक्यता आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी धनु राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला हलवा अर्पण करा.
मीन राशी
या राशीच्या लोकांसाठी पुत्रदा एकादशी खूप शुभ असणार आहे. भगवान विष्णूच्या कृपेने या राशीच्या लोकांना शुभवार्ता मिळू शकते. नोकरीत प्रगती होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. पालकांमुळे मुलांना आनंद मिळेल. भगवान विष्णूच्या कृपेने तुम्ही नवीन जमीन खरेदी करू शकता. या दिवशी वेळ पूर्णपणे अनुकूल राहील. मीन राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला खीर अर्पण करा.