ज्यांना रोज स्वामी सेवा करायला जमत नसेल गुरूवारी संध्याकाळी करा ही सेवा!

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामीभक्त आहेत दररोजच्या कामामुळे फोन करणे शक्य नसते आणि भरपूर कामामुळे देखील स्वामींची सेवा करणे जमत नसेल तर तुम्ही गुरुवारी संध्याकाळी ही स्वामींची सेवा आवश्यक करा यामुळे स्वामी महाराज नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील. ज्यांना रोज स्वामी सेवा करायला जमत नसेल त्यांनी मनोभावे फक्त गुरुवारी संध्याकाळी ही सेवा करा.

दर गुरुवारी फक्त ही एक स्वामी सेवा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे भक्त, स्वामींचे सेवेकरी आहात आणि स्वामी समर्थ महाराजांवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे तर तुम्ही ही माहिती नक्की वाचा कारण यातून मी तुम्हाला अशी एक स्वामींची सेवा सांगणार आहे जी तुम्ही दर गुरुवारी केली तर तुम्हाला नक्की याचे फळ मिळेल.

मित्रांनो आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याचशा लोकांना रोज स्वामींची सेवा किंवा इतर देवांची किंवा गुरूंची सेवा करणे शक्य नसते. रोज धावपळ असते. परंतु जर तुम्ही रोज न करता फक्त दर गुरुवारी स्वामींची ही सेवा केली तर तुम्हाला याचे फळ नक्की मिळेल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.मित्रांनो ही सेवा अगदी सोपी आहे.

तुम्हाला फक्त स्वामी समर्थांच्या दोन गोष्टी करायचा आहेत. ती संध्याकाळी करा. सकाळी करून परत संध्याकाळी केली तरी चालेल. पण दर गुरुवारी करा.त्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला फक्त एक वेळा अक्कलकोट स्वामी स्तोत्र वाचायचे आहे. youtube ला अक्कलकोट स्वामी स्तोत्र आहे किंवा गुगलला तुम्ही अक्कलकोट स्वामी स्तोत्र टाकलं तर मराठीमध्ये तुम्हाला अक्कलकोट स्वामी स्तोत्र मिळेल.

तर तुम्हाला एक वेळा अक्कलकोट स्वामी स्तोत्र वाचायचे आहे. आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाचा जप तीन माळा करायचा आहे. एक एक माळ करत तीन माळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या नावाचा जप मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने करायचा आहे. फक्त तीन माळा जप करा आणि अक्कलकोट स्वामी स्तोत्र एक वेळेस वाचा. नक्की तुमच्या इच्या मनोकामना पूर्ण होतील.

Leave a Comment