ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक कालावधीनंतर ग्रह आपली स्थिती बदलत असतात. राशीचक्रातील 12 राशीत भ्रमण करत असताना वक्री, अस्त-उदय अशी स्थिती पाहायला मिळते. त्या त्या परिस्थितीचा राशीचक्रावर परिणाम होत असतो. 24 ऑगस्टपासून पाच ग्रह वक्री अवस्थेत असणार आहे.
त्यामुळे राशीचक्रात मोठी उलथापालथ दिसून येणार आहे. राहु आणि केतु हे राशीचक्रात वक्री अवस्थेत भ्रमण करत असतात. शनि आणि शुक्र सध्या वक्री अवस्थेत आहेत आणि 24 ऑगस्टपासून बुद्धि आणि व्यवसायाचा कारक असलेला बुध ग्रह वक्री अवस्थेत जाणार आहे. त्यामुळे राशीचक्रात मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे. चार राशीच्या जातकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळताना दिसणार आहे. चला जाणून कोणत्या राशींना साथ मिळणार ते.
मेष : या राशीच्या जातकांना पाच ग्रहांच्या वक्री अवस्थेचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळू शकते. गेल्या काही दिवसापासून अडकलेले पैसे या कालावधीत मिळतील. वैवाहिक जीवन आनंदाता राहील. पण या कालावधीत रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. कारण आपल्या कठोर वाणीमुळे एखाद्याच्या भावना दुखवू शकतात. मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल.
मिथुन : या राशीच्या जातकांना पाच ग्रहांची स्थिती अनुकूल ठरणार आहे. या कालावधीत आर्थिक स्थिती मजबूत राहील. हाती घेतलेली कामं पूर्ण होतील. समाजात सन्मान वाढेल आणि चांगल्या प्रकार आदरतिथ्य होईल. परदेश यात्रा या काळात घडू शकते. सुख समृद्धीत वाढ होऊ शकते.
सिंह : या कालावधीत आरोग्याची उत्तम साथ लाभेल. राजकारण आणि समाजसेवेशी निगडीत लोकांना जबरदस्त लाभ मिळणार आहे. राजकारणातील लोकांना अपेक्षित पद मिळू शकते. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक बदल दिसून येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना बॉसकडून कौतुकाची थाप पडेल. संतान प्राप्तिसाठीसाठी इच्छुक असलेल्या गोड बातमी मिळू शकते.
तूळ : या कालावधीत नशिबाची उत्तम साथ लाभेल. जे काम हाती घ्याल ते काम पूर्ण होईल. व्यवसायात प्रगती दिसून येईल. अविवाहित जातकांना स्थळं चालून येतील. पण योग्य निवड करणं गरजेचं आहे. गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ राहील. तसेच भविष्यात उत्तम परतावा गुंतवणुकीतून मिळू शकतो.