वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह वेळोवेळी आपली जागा बदल असतात. ग्रह गोचरमुळे एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. लवकरच ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धीचा कारक बुध आपली स्थिती बदलणार आहे. बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, उत्तम तर्क करण्याची क्षमता आणि उत्तम संवाद कौशल्याचा कारक मानला जातो. येत्या 24 ऑगस्ट 2023 ला दुपारी 12.52 वाजता सिंह राशीत प्रतिगामी होणार आहे. जेव्हा बुध वक्री स्थितीत असणार आहे त्यामुळे काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात उलथापालथ होणार आहे. अशा परिस्थितीत त्यांना दिलासा मिळण्यासाठी विशेष उपाययोजना करावा लागणार आहेत.
मेष राशी
या राशीच्या लोकांच्या जीवनात आर्थिक समस्या निर्माण होणार आहे. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे अडकणार आहे. त्यामुळे या काळात गुंतवणूक करताना काळजी घ्या. मुलांना अभ्यासात एकाग्रतेच्या अभावाचा सामना करावा लागणार आहे. प्रेमळ जोडप्यांच्या आयुष्यात अडचणी येणार आहेत. गर्भवती महिलांना समस्या निर्माण होणार आहे.
उपाय – रोज बुध ग्रहाच्या बीज मंत्राचा जप करा.
मिथुन राशी
बुध वक्रीमुळे या राशीच्या लोकांना भावंडांसोबतच्या नात्यात समस्या निर्माण होणार आहे. लेखन क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाणार आहे. तुमच्या लॅपटॉप, मोबाईल फोन किंवा कॅमेरामध्ये समस्या निर्माण होणार आहे. तुमचं खर्च पूर्वीपेक्षा जास्त वाढणार आहे. या दिवसात कोणत्याही प्रकारचे वादविवाद करु नका.
उपाय – बुधवारी पंचधातू किंवा सोन्याची अंगठी परिधान करा.
सिंह राशी
या राशीचे लोक बुधाच्या प्रतिगामी अवस्थेत पचन, त्वचा किंवा घसा संबंधी आरोग्य समस्यांमुळे उद्भवणार आहे. या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका नाही तर मोठ्या समस्येमध्ये अडकू शकता. घरात स्वच्छता ठेवा आणि संतुलित आहार करा. वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होणार आहे. पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
उपाय – रोज तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा.
वृश्चिक राशी
जेव्हा बुध वक्री स्थितीत येतो तेव्हा तुमच्या घरातील उपकरणे खराब होण्याची भीती असते. तुमच्या आईच्या तब्येतकडे लक्ष द्या. तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढणार आहे. व्यवसायात नुकसान होणार आहे. नोकरदार लोकांसाठी हा काळ अडचणींचा ठरणार आहे.
उपाय – कामाच्या ठिकाणी आणि घरी बुद्ध यंत्र स्थापित करा.