मित्रांनो प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असते आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण दिवस रात्र काबाडकष्ट करत असतो. जेणेकरून आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. परंतु काही वेळेस या इच्छा अपूर्णच राहतात. म्हणजेच त्यामध्ये काही ना काही बाधा उत्पन्न अडचणी निर्माण होते आणि ही इच्छा आपली अपूर्ण राहते.
मित्रानो श्रावण महिना सुरू झालेला आहे. सोमवार हा महादेवाचा दिवस आहे. आपला सर्वात पवित्र श्रावण महिना सुरू आहे. या महिन्यात आपण काही आवश्य्क गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे. बरेचजण उपवास करतात.
तर आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या मनातील इच्छा या सात दिवसांमध्ये पूर्ण होतील आणि तर हा जो उपाय आहे हा उपाय करीत असताना आपण अगदी मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे. तर मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असते.
हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कधीही करू शकता. तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे. तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे आणि घरातील देवी देवतांची व्यवस्थित पूजा करून घ्यायचे आहे. नंतर शिवलिंगावरती तुम्ही बेलपत्र, पांढरे फुले अर्पण करायचे आहेत.
त्यानंतर तुम्हाला आपल्या मनातील इच्छा महादेवांना बोलून दाखवायची आहे आणि एक रुपयाचा शिक्का तुम्हाला महादेवाच्या मंदिरात ठेवायचा आहे किंवा तुम्ही शिवलिंग वरती देखील ठेवू शकता. रात्रभर तुम्ही तो शिका तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा शिका तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे.
मित्रांनो आपली जी मनातील इच्छा अपूर्ण राहिलेली आहे ही या उपायामुळे नक्कीच पूर्ण होईल. परंतु हा उपाय तुम्हाला अगदी मनोभावे करायचा आहे. श्रावण महिन्यातच करायचा आहे.