पहिल्या श्रावण सोमवारी ‘या’ राशींचे भाग्य बदलणार; होणार भाग्योदय!

मित्रानो वर्षभरात येणाऱ्या अनेक महुर्तांचा आपल्या कुंडलीवर परिणाम होत असतो. काही लोक म्हणतात की, साडेसाती मागे लागली.तर काही लोक म्हणतात, लक्ष्मीची कृपा झाली. या तुमच्या कुंडलीत होणाऱ्या बदलाला काही शुभ-अशुभ योगही जबाबदार असतात. कुंडली अन् नक्षत्रांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा राशीचक्रावरही विश्वास असतो. कारण, कुंडली आपल्या जन्मावरून बनवलेली असते. त्यामुळे आपल्या आयुष्यात कधी चांगल घडणार हे कुंडलीत स्पष्टच लिहीलेलं असतं.

श्रावण महिन्याला सुरूवात झाली असून यंदा दुर्लभ असा योग आला आहे. पहिल्याच श्रावण सोमवारी नागपंचमीही आली आहे. त्यामुळे भगवान शकर आणि त्यांचा दागिना असलेल्या नागदेवतेची पूजा एकत्रच आपल्या हातून घडणार आहे.

नागपंचमी हा सण दरवर्षी सावन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो, या दिवशी नाग देवतेची पूजा करण्याचा विधी आहे. यंदा २१ ऑगस्टला म्हणजेच पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमी साजरी होणार आहे. हा दिवस श्रावण सोमवार असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढणार आहे. नागपंचमीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि नाग देवता यांचे आशीर्वाद एकत्र मिळतील. यासोबतच नागपंचमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील एक शुभ योगायोग बनत आहे, जो काही राशींसाठी खूप भाग्यवान असणार आहे. चला जाणून घेऊया नागपंचमीचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे.

नागपंचमीला या काही राशींना मिळेल भोलेनाथ आणि नागदेवतेचा आशीर्वादवृश्चिक राशीच्याआधीच्या नोकरीत त्यांचे समाधान होत नाहीय. त्यामुळे जे लोक नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी हा दिवस नशीब पालटणारा ठरणार आहे. भगवान शंकर अन् नागदेवाची पूजा केल्याने नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या लोकांना चांगल्या पॅकेजची नोकरी मिळेल. तसेच, जे लोक वृश्चिक राशीचे आहेत पण त्यांना नवा व्यवसाय सुरू करायचाय तर त्यांच्यासाठी हा दिवस शुभलाभ देणारा ठरणार आहे.

मकर राशी
अनेक दिवसांपासून जर तुमच्यावर सतत अडचणी येत असतील. आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल. तर, हा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी वेगळा असणार आहे.मकर रास असलेल्यांनी नागपंचमीच्या दिवशी भोलेनाथ आणि नागदेवतेची एकत्र पूजा करावी, असे केल्याने अनेक दिवसांपासून चालत आलेल्या समस्या दूर होतील. उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होतील. कुटुंबात सुख-शांती नांदेल.

धनु राशी
एखाद्य कामाचा शुभारंभ करण्यासाठी तुम्ही वाट पाहत असाल. आणि तुमची रास जर धनु आहे तर याहुन मोठा दिवस तुमच्या आयुष्यात दुसरा असणार नाही. धनु राशीवर सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे नाग पंचमी धनु राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान सिद्ध होईल.या विशेष योगात नागदेवतेची पूजा केल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. नवीन नोकरी सुरू करण्याची ही एक उत्तम संधी आहे.

कुंभ राशी
ज्या लोकांचे लग्न ठरण्यात अडचणी येत आहेत. त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण करावे. असे केल्याने सर्व समस्या दूर होतील. जे काम तुम्ही खूप दिवसांपासून करण्याचा प्रयत्न करत होता ते पूर्ण होईल.

Leave a Comment