हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरु झालेला आहे. श्रावणाच्या एक दिवस आधीच ग्रहस्थितीमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण बदल घडून आल्याने अनेक शुभ राजयोग या कालावधीत तयार होत आहेत. १७ ऑगस्ट २०२३ला या वर्षातील सर्वात महत्त्वाचे असे सूर्याचे गोचर सुद्धा पूर्ण झाले आहे. सूर्यदेव तब्बल ३६५ दिवसांनी स्वतःच्या सिंह राशीत परतले आहेत.
सिंह राशीत अगोदरच बुध, मंगळ, आणि चंद्रमा उपस्थित आहेत अशातच सूर्याच्या प्रवेशाने सिंह राशीत अत्यंत दुर्मिळ असा चतुर्ग्रही राजयोग तयार झाला आहे. हा राजयोग मेष ते मीन सर्व राशींवर प्रभावी असणार आहे. पण ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार चार अशा राशी आहेत ज्यांना या काळात अचानक व अनपेक्षित धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या मंडळींना नेतृत्व करण्याची नामी संधी यावेळी मिळू शकते.
वृषभ रास
वृषभ राशीच्या मंडळींसाठी चतुर्ग्रही राजयोग हा मोठे बदल घेऊन येऊ शकतो. तुम्हाला या कालावधीत नशिबाची तगडी साथ लाभू शकते ज्यामुळे अनपेक्षित प्रमाणात धनलाभाची चिन्हे आहेत. ताण- तणाव दूर होऊन घरात हसते- खेळते वाटचारां राहील. अडकून पडलेली कामे मार्गी लागतील. संपत्तीशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो त्यावेळेस मात्र भावनिक होणे टाळावे. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत.
मिथुन रास
मिथुन राशीसाठी सुद्धा चतुर्ग्रही राजयोग हा शुभ फलदायक असणार आहे. या राशीच्या मंडळींची ऊर्जा ही अत्युच्च असेल. सूर्याच्या गोचराचा प्रभाव आत्मविश्वासात दिसून येईल त्यामुळे तुम्हाला जी कामं करण्यात संकोच वाटत होता पण इच्छा होती, ती सर्व कामे मार्गी लावता येतील. विशेष म्हणजे या नेहमीपेक्षा वेगळ्या मार्गातूनच आपल्याला अधिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या कामांसाठी तुम्हाला नेतृत्व करावे लागू शकते.
तूळ रास
चतुर्ग्रही योग बनल्यामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. कारण हा योग तुमच्या संक्रमण कुंडलीतून दहाव्या घरात तयार होणार आहे. जे व्यवसाय आणि नोकरीचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. यावेळी तुम्ही व्यवसायात चांगली कमाई करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या वडिलांची साथ मिळू शकते. न्यायालयीन प्रकरणांमध्ये यावेळी यश मिळू शकते.
वृश्चिक रास
चतुर्ग्रही योग तयार झाल्यामुळे तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. कारण तुमच्या पारगमन कुंडलीत नवव्या स्थानात हा योग तयार होणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नशिबाची साथ मिळेल. तसेच दीर्घकाळ रखडलेली कामेही करता येतील. यावेळी तुम्ही व्यवसाय संबंधित प्रवास करू शकता. जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याच वेळी, आपण यावेळी वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता.