स्वामी तुमच्या सर्व अडचणी दूर करतील! फक्त त्यांची ही काही कामे करा…

मित्रांनो, स्वामींनी आपले काम केले किंवा अडचण दूर केली की आपण निवांत होतो व आपल्याला त्यांच्या कृपेचा विसर पडतो आणि आपल आयुष्य जगण्यात मग्न होतो व कळत न कळत पापाचे धनी होतो.

बरेच भक्तांना कृपेची जाणीव असती पण पुढे काय कराव हे माहित नसते. खरेतर ज्यांना स्वामींची प्रचीती आली आहे व पुन्हा कसलीच अडचण येऊ नये असे वाटते त्यांच्यासाठी थोडी वेगळी सेवा.

सर्व प्रथम आपल्या ह्रदयाचे चौरंग करून त्यावरती स्वामींची प्राणप्रतीष्ठा व नित्य मानसपूजा करावी. आपण जे जे कर्म करतो , जे जे खातो, जे जे हवन करतो, जे जे दान करतो, जे जे जप तप करतो ते सर्व स्वामींना अर्पण करावे.

स्वामींच्या मंदिरात जाऊन हा देह सर्व दोषांनसह अर्पण करावा व संपूर्ण शरणागती पत्करावी. निशंक आणि निर्भय होऊन नित्य उपासना करावी, त्यामूळे जीवनातील सर्व संकटे नष्ट होतात. भक्तीभावाने तन, मन आणि आत्म्याने सेवेत रुजू झाले पाहिजे.

भजन, कीर्तन, प्रवचन सारखे सत्संगती जास्तीत जास्त रहाण्याचा प्रयत्न करावा. गुरूचरण लाभासाठी नित्य स्वामींना प्रार्थना करावी व गुरू लाभ झाल्यास त्यांच्या शब्दात राहून ते सांगेल ते आचरण करावे. दुसऱ्याला आनंद देणे, दुसऱ्यावर प्रेम करणे, दुसऱ्याच्या भल्याचा विचार करणे, त्यांची निरपेक्ष सेवा करणे अशा अनेक गोष्टी करावे ज्यामुळे स्वामींच्या अनेक पटीने जवळ जाता येईल.

असूया, मत्सर, व्देष, तिरस्कार आदी अनेक विकारांवर मात करूण आपला मौल्यवान वेळ चिंतनात व सेवेत घालवावा.
सर्वत्र स्वामींना पाहणे व स्वामींमध्ये सर्व पाहणे, हा अभ्यास रोज करावा. स्वामींचा प्रचार व प्रसार करून जास्तीत जास्त स्वामी सेवक घडण्यासाठी प्रयत्नशील रहावे.

घरातील देवत आई वडील यांची सेवा करावी व त्यांचे नित्य दर्शन घ्यावे. ज्ञानी होऊन स्वामी भावनेमध्ये स्थित राहून दृढ निश्चयाने.श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करत मग्न राहून दिव्य अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा.

Leave a Comment