मित्रांनो ज्यांनी मृत्यूवर विजय प्राप्त केला आहे. असुरांना ज्याची भीती वाटते ज्याचा कंठ निळा आहे. जो कल्याणकारी अमृताचा स्वामी आणि मंगलमय आहे.
अशा सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ असलेल्या भगवान शंकराच्या- महादेवांच्या पिंडाची पूजा कशी करावी ? याची माहिती आज आपण पाहणार आहोत.
मित्रांनो प्रत्येक देवता एक तत्व आहे. देवता पूजन करताना पूजनाचा पूर्ण लाभ व्हावा यासाठी पूजा करताना ज्यामुळे देवतेचे तत्त्व त्या मूर्तीत किंवा चित्रात आकर्षित होईल अशा साहित्याचा उपयोग करतात.
मित्रांनो शिवाच्या मंदिरात पूजेसाठी कुठे बसावे साधारणपणे शिवाच्या मंदिरात पूजन आणि साधना करणारे श्रद्धाळू शिवाकडून येणार्या लहरी सरळ आपल्या अंगावर घेत नाहीत.
कारण त्या लहरी सहन करण्याची आपली क्षमता नसते आणि त्यामुळे आपल्याला त्रासही होऊ शकतो शिवाच्या लहरी समोरून निघतात त्या स्रोतातून बाहेर पडतात.
1)पिंडीला स्नान करणे : शिवाच्या पिढीला थंड पाण्याने स्नान घालतात, शिवपिंडीला दुधाने स्नान घालतात, काहीजण पिंडीला पंचामृताने स्नान घालतात.
2)शिवपिंडीची पूजा हळद आणि कुंकू निषिद्ध मानले आहेत. हळद भूमीत उगवते आणि ते अंकुरणाऱ्या भूमीचे म्हणजे उत्पत्तीचे प्रतीक आहे. कुंकू हळदी पासून बनवतात म्हणून तेही उत्पत्तीचे प्रतीक आहे.
3) शिव ही लयाची देवता असल्याने भस्म लावतात. भस्म लयाचे दर्शक असल्याने शिवपिंडीला भस्म लावतात. पिंडीच्या दर्शनी भागावर भस्माचे तीन आडवे पट्टे असतात किंवा आडवे पट्टे ओढून त्यावर मध्ये एक गोल काढतात त्याला शिवाक्ष असे म्हणतात.
4) शिवपुजेतील अन्य एक महत्त्वाचा घटक आहे पांढऱ्या अक्षता. पांढऱ्या अक्षता वैराग्याच्या म्हणजे निश्काम साधनेच्या द्योतक आहेत.
शंकर ही एक उच्च देवता असून ती निर्गुणाशी संबंधित असल्यामुळे पांढऱ्या अक्षता पिंडीच्या पूजनात वापरल्याने शिव तत्वाचा अधिक लाभ होतो.
5)शिवाच्या पूजेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे बिल्वपत्र म्हणजे बेलाचे पान. अथर्ववेद आणि शतपथ ब्राह्मण या ग्रंथांमध्ये वृक्षाचा उल्लेख आढळतो. बिल्व वृक्ष एक पवित्र यज्ञ वृक्ष आहे.
बिल्वपत्रात शिवतत्व अधिकाधिक प्रमाणात आकृष्ट करण्याची क्षमता असते. शिवपिंडीची पूजनात बिल्वपत्राचे देठ पिंडीकडे आणि पानाचे पुढचे टोक आपल्याकडे करून ते वहावे.
6) शिवाला निशिगंध जुई मोगरा धोत्रा पांढरी कनेर पांढरे कमळ अशी पांढरी फुले वाहतात. पांढऱ्या रंगाच्या फुलांमध्ये शिवतत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असते फुल वहातांना त्याचे देठ देवाकडे असावे.
7) शिवाची आरती करण्यापूर्वी शंखनाद आवश्यकता आहे. कारण शंखनाद केल्याने वातावरणाची शुद्धी होते दुसरे वैशिष्ट्य आहे शिवाला तुळस वाहता नाही परंतु शाळीग्राम किंवा श्रीविष्णूचा मूर्तीला वाहिलेली तुळस शिवाला वाहातात.
8) शिवपिंडी वाहिलेला बैल आणि पांढरी फुले फक्त प्रसाद म्हणून घेत नाहीत आणि नैवेद्य ग्रहण करत नाहीये. शिव ही वैराग्याची देवता असल्याने शिवाला अर्पण केलेल्या वस्तू ग्रहण केल्यास सामान्य व्यक्तीला वैराग्य येऊ शकते.
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.