आज कमला एकादशीला संध्याकाळी करा हा मंत्र जप, सर्व आर्थिक समस्या होतील दूर!

मित्रानो एकादशी दर पंधरा दिवसांनी येत असते आणि त्याचे विशेष महत्वही असते. एकादशीला विष्णू पूजेला महत्व असते. कमला एकादशीचे व्रत केल्याने साधकाला शुभ फळ प्राप्त होते.

आज 12 ऑगस्ट २०२३ रोजी कमला एकादशी आहे. अशात कमला एकादशीला विधीवत पूजा जप करून विष्णूकृपा प्राप्त करता येते. असे मानले जाते की, जे लोक ही एकादशी मनापासून करतात त्यांना वाइट कर्मफळांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती हेते.

या व्रतामुळे जाणत्या, अजाणत्यापणे झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते. कमला एकादशीच्या व्रताचे अश्वमेध यज्ञांप्रमाणे फळ मिळते. या दिवशी भगवान विष्णूंना तुळस अर्पण केल्याने पितृदोष मुक्त होता. इच्छापूर्ती होते. व्रत पूजाविधीसकाळी स्नान झाल्यावर देवघरात गंगाजल शिंपडून पवित्र करावे. त्यानंतर चौरंगावर पिवळा कापड टाकून त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. पंचामृत, फळ, मेवा, मिठाई अर्पण करावे. त्यानंतर मनोभावे पूजा करावी. पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. पूजेत तुळस नक्की अर्पण करावी.

आज एकादशीच्या संध्याकाळी तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तो मंत्र काहीसा असा आहे,
ओम नमो भगवते वासुदेवाय नमःओम नमो नारायणाय नमःश्रीमन नारायण नारायण हरीहरीश्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण

Leave a Comment