शनिवारी ‘या’झाडाखाली दिवा लावा दिवा, सुख समृद्धी नांदेल!

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला फार महत्त्व आहे. वैज्ञानिक दृष्ट्या बघितले तर मानवासाठी पिंपळाचे झाड वरदान आहे. कारण इतर झाडे दिवसा ऑक्सीजन सोडतात, तर रात्री कार्बन डाय ऑक्साईड. परंतु पिंपळ चे झाडं दोन्ही वेळेला ऑक्झिजन सोडते. धार्मिक दृष्ट्या श्री कृष्णाने सांगितले आहे की सर्व वृक्ष मध्ये नी पिंपळाचे वृक्ष आहे आणि या झाडाच्या सावलीत उभे राहिल्यास आपणास सकारात्मक ऊर्जा मिळते. कुंडलीत असणाऱ्या दोषांना दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची खूप मदत होते.

पद्मपुराण नुसार पिंपळाचे झाड श्री हरी विष्णूचे रुप असल्याने या वृक्षाला श्रेष्ठ देव वृक्षाची पदवी मिळाली आहे. पौर्णिमा दिवशी देवी लक्ष्मी चे वास्तव्य पिंपळाच्या झाडाला असते. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या वास्तु शास्त्रानुसार आणि पद्म पुराण नुसार पिंपळाचे पूजन आणि प्रदक्षिणा केल्यास आयुष्य वाढते. जे लोकं पिंपळ ला पाणी घालतात त्यांची सर्व पापातून मुक्त होऊन त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते आणि पिंपळाच्या मध्ये पितरांचा वास असल्याचे मानले जाते. सर्व तीर्थ असल्याचे मानले जाते. शास्त्र नुसार पिंपळाच्या झाडात शनी देवाचे वास्तव्य आहे असे मानले जाते.

शनी दोष किंवा शनीची साडेसाती यासाठी प्रदक्षिणा केल्यास शनी देवाचे प्रकोप पासून आपल्याला सुटका मिळते. पिंपळाच्या झाडात लक्ष्मीची बहीण अलक्षमी चे वास्तव्य असल्याने याचे सूर्यास्त पासून ते सूर्योदय पर्यंत पूजन करावे.आणि मित्रांनो रात्री या झाडाचे पूजन केल्यास आपणास गरिबी येते. श्री हरी विष्णूनी असा आशीर्वाद दिलेला आहे की शनिवारी या झाडाचे पूजन केल्यास शनी दोषांपासून मुक्ती मिळते. देवी लक्ष्मी ची कृपा होईल. शनी देवां च्या कोप पासून धन, ऐश्वर्य नष्ट होते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो जर आपण शनिवारी या झाडाचे पूजन केल्यास शनी देवता आणि देवी लक्ष्मी यांची कृपा होईल. रविवार सोडून रोज पिंपळाच्या झाडाचे पूजन करणे शुभ असते. परंतु मित्रांनो अमावस्या व शनिवार या दिवशी केलेले पूजन जास्त लाभदायक ठरते. शनिदेवाच्या प्रकोप पासून वाचण्यासाठी शनिवारी एक मातीचा किंवा पिठाचा दिवा घ्यावा. त्यात राईचे तेल टाकून कापसाची वात न टाकता काळया धाग्यांची वात टाकावी आणि त्यात एक खिळा किंवा एक रुपयाचे नाणे टाकावे.

आणि मित्रांनो हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावला. दिव्याची ज्योत पश्चिमेला येईल अशा प्रकारे लावावी. कारण पश्चिम दिशेचे स्वामी श्री हरी आहेत. शनी देवांची कृपा होते व त्यांच्या प्रकोप पासून सुटका होते आणि पितृदोष असेल तर पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. यामुळे आपल्या पितरांची आपल्यावर कृपा होते. जर तुम्हाला सर्व देवी देवतांची कृपा मिळवायची असेल आणि पितृ दोष, कालसर्प दोष या पासून सुटका मिळवायची असेल तरएक मातीचा किंवा पिठाचा दिवा घेऊन त्यात राईच तेल टाकावे.

आणि गोल वात घेऊन दिव्याच्या मधोमध ठेवावी त्यात थोडेसे काळे तीळ टाकावे. या दिव्याची ज्योत मधोमध वर जाणारी असावी. तो पिंपळाच्या झाडाखाली लावावा.आणि मित्रांनो दिवा लावल्यावर श्री गणेशाला नंतर देवी लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांना वंदन करावे. हनुमानाला वंदन करावे. नंतर सर्व देवी देवतांना वंदन करून शनी देवां ना व आपल्या पितरांना नमस्कार करून त्यानंतर हनुमान चालीसा वाचावी.श्री हरी विष्णू यांच्या

” मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय” हा १०८ वेळा उच्चार करावा. जर शनी दोषणपासून मुक्ती मिळवायची असेल तर “ओम शं शनैष्वराय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

आणि पितृदोष पासून मुक्ती मिळवायची असेल तर ओम पित्रुभ्य नमः या मंत्राचा जप करावा. राईच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावला व हनुमान चालीसा वाचन केल्यास सर्व ग्रह पीडा नष्ट होते आणि त्याचबरोबर शनी दोषणपसून मुक्ती मिळते. शनी देवा नी स्वतः सांगितले आहे की जे हनुमान ची भक्ती करतात त्यांच्यावर कधीही शनी दोष लागणार नाही. पिंपळाच्या झाडाचे पूजन केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment