ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीचक्रात बदल करतात. बुध ग्रह धन, व्यापार यांचा दाता मानला जातो. ज्यावेळी बुध ग्रह गोचर करतो म्हणजेच त्याच्या स्थितीत बदल होतो तेव्हा लोकांच्या आर्थिक स्थितीवर तसंच करिअरवर त्याचा मोठा प्रभाव पडताना दिसतो. येत्या काळात बुधाच्या स्थितीत मोठा बदल होणार आहे.
ऑगस्ट महिन्यात बुधाचं गोचर होणार आहे. 21 ऑगस्ट 2023 रोजी बुध कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. 1 वर्षानंतर बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान यावेळी भद्र राजयोग निर्माण होणार आहे. भद्र राजयोगाचा चांगला परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
कन्या रास
बुधाच्या गोचरचा चांगला परिणाम या राशीच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. बुध कन्या राशीत प्रवेश करत असून 2 ऑक्टोबरपर्यंत कन्या राशीत राहणार आहे. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व उजळेल. मोठ्या कंपनीत नोकरी मिळू शकते. तुमच्या आयुष्यात प्रेम वाढेल. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. भागीदारीत काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित केले जाऊ शकतात. प्रवासातून अनुकूल परिणाम होणार आहेत.
मकर रास
बुध गोचरमुळे तयार होणारा भद्र राजयोग मकर राशीच्या लोकांना खूप लाभ देणार आहे. यावेळी तुमचं नशीब सोबत राहणार आहे. तुम्हाला कामात भरपूर यश मिळेल. तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. कोर्ट-कचेरीचे प्रश्न सुटणार आहेत. कोणत्याही वादात निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. अचानक धनलाभाची शक्यता देखील आहे. नोकरी-करिअरमध्ये प्रगती होईल.
धनु रास
बुध गोचरामुळे तयार होणारा भद्र राजयोग धनु राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणारा असणार आहे. करिअरसाठी हा काळ खूप चांगला आहे. बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. ऑफिसमध्ये सगळ्यांपेक्षा चांगला असेल. धन आणि लाभाचे प्रमाण चांगले राहील. कोणत्या ठिकाणी पैसे अडकलेले असतील तर ते मिळू शकणार आहे. व्यावसायिकांना चांगली ऑर्डर मिळू शकते. या योगाच्या प्रभावामुळे अविवाहित राशीच्या लोकांच्या लग्नासाठी शुभ मुहूर्त असणार आहेत.