Friday, September 22, 2023
Homeअध्यात्मशनिवारच्या दिवशी नक्की करा ही स्वामी सेवा ; जे हवे ते...

शनिवारच्या दिवशी नक्की करा ही स्वामी सेवा ; जे हवे ते सगळे काही मिळेल!

मित्रांनो, आपल्याला सर्वांना तर माहीतच आहे की ज्या गोष्टी आपल्याला शक्य नाही. त्या सर्व गोष्टी स्वामी समर्थ महाराजांना शक्य आहेत. म्हणूनच अशक्य ही शक्य करतील स्वामी. असे आपण सर्व सेवेकरी म्हणतो. कारण महाराजांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपण जी स्वामींची सेवा करणार आहोत, ही स्वामींची शनिवारची विशेष सेवा आहे.

तुम्हाला गुरूवारची सेवा शुक्रवारच्या सेवा माहित आहेत. ही शनिवारची सेवा देखील खूप महत्त्वाची सेवा आहे. शनिवारच्या दिवशी आपण ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेत करू शकतो. घरातील कोणत्याही एका सदस्याने जर ही सेवा केली तर त्याचा लाभ संपूर्ण घराला घरातील सर्व सदस्यांना होतो.

आपण जी शनिवारची विशेष सेवा करणार आहोत. या सेवेमध्ये आपल्याला तीन सेवा करायचे आहेत. आपल्याला या तीनही सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या समोर किंवा देवघरासमोर बसून करायचे आहेत. यातील पहिली सेवा आहे ती म्हणजे आपल्याला एका मंत्राचा जप संपूर्ण एक माळ करायचा आहे. आपण ज्या मंत्राचा जप करणार आहोत. तो मंत्र पुढील प्रमाणे

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा औदुंबराचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे.त्यानंतर संपूर्ण एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक वेळेस गीतेतील पंधरावा अध्याय वाचायचा आहे. गीतेचा पंधरावा अध्याय स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवा या पुस्तकांमध्ये दिलेला आहे, तो तुम्ही वाचू शकता.

वरील लेखांमध्ये सांगितलेल्या तीनही सेवा आपल्याला श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे आहेत. ही सेवा खूप चमत्कारी व प्रभावशाली सेवा आहे. आपल्याला ही सेवा दररोज करायची नाही. प्रत्येक शनिवारी ही स्वामींची प्रभावशाली आणि चमत्कारी सेवा करा स्वामी प्रसन्न होतील. सर्वकाही आपल्या मनासारखे होईल, स्वामींचा आशीर्वाद मिळेल.

ही सेवा फक्त आपल्याला शनिवारच्या दिवशी करायची आहे. इतर दिवसांची सेवा ही वेगळी असते. आणि ती ज्या त्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने करायची असते. ही फक्त शनिवारच्या दिवशी करायची सेवा आहे. दररोज दिवसानुसार जर स्वामींच्या अशा विशेष सेवा केला तर स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतील. आणि आपण ज्यासाठी या सेवा करत आहोत.

त्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतील या सेवेचे लाभ आपल्याला होतील. त्याचे अनुभव देखील येतात. आपण जी काही सेवा केलेली आहे. त्या सेवेचे आपल्याला फळ देखील मिळते. त्यामुळे तुम्ही देखील ही सेवा दिवसानुसार रोजच्या रोज करत रहा. याचे चांगले अनुभव चांगले फळ तुम्हाला देखील मिळतील आणि आपल्याला जे काही हवे आहेत ते सर्व काही मिळेल.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन