संकष्टी दिवशी बाप्पांना अर्पण करा हा नैवेद्य सर्व इच्छा पूर्ण होतील!

मित्रांनो 4ऑगस्ट शुक्रवार दिवशी संकष्टी आलेली आहे. या दिवशी बळ बुद्धी विद्येचे देवता श्री गणेश यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की यादिवशी व्रत व श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनात सफलता प्राप्त होते आणि संकटांन पासून सुटका मिळते या दिवशी श्री गणेशांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही विशेष उपाय तुम्ही केले तर श्री गणेश त्वरित प्रसन्न होतात. व तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थी ची पूजा ही संध्या काळी करण्याचे विधान आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प करावा.

पूजे मध्ये श्री गणेशांना पिवळी फुले अर्पण करावीत. धूप दीप दाखवावा. श्री गणेशांना प्रिय अश्या दुर्वा अर्पित कराव्यात पूजे नंतर लाडू किंवा मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा. श्री गणेश हे सर्व देवी देवतांन मध्ये प्रथम पूजनीय आहेत. त्यामुळे कोणतेही कार्य असो श्री गणेशांचे पूजन अवश्य केले जाते आणि त्यांची पूजा आराधना करताना तुम्ही काही नियमांचे पालन करून छोटे छोटे उपाय केले तर श्री गणेश बळ बुद्धी व विद्येचे वरदान देतात. त्याच बरोबर सर्व संकटांचा नाश करून तुमची मनोकामना पूर्ण करतात. चला तर मग जाणून घेऊयात संकष्ट चतुर्थी ला केले जाणारे उपाय. संकष्ट चतुर्थी च्या दिवशी व्रत करून.

श्री गणेशांना 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येते मित्रांनो ऑगस्ट महिन्यातील चतुर्थीला श्री गणेशांना समोर चौमुखी दिवा प्राज्वलीत करावा. यामुळे करू सिद्धी होते. या दिवशी श्री गणेशांना गुलाल अर्पण केल्याने धन वृद्धी होते. मित्रांनो जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असे तुम्हाला वाटत असेल. तर या दिवशी श्री गणेशांच्या मस्तकावर 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत. लक्षात ठेवा की श्री गणेशांच्या मस्तकावरच या दुर्वा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. आणि तुमची जी इच्छा असेल ती मनोमन बोलायची आहे.

आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री गणेशांन जवळ प्रार्थना करायची आहे. या उपायाने तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तसेच तुम्हाला धना संबंधित काही तक्रार असेल. तुम्हाला असे वाटत असेल की जीवनात आर्थिक उन्नती होत राहावी किंवा तुमचे एखादे कार्य असेल जे अनेक अडचणींन मुळे पूर्ण होत नसेल तर यासाठी एक आठ मुखी रुद्राक्ष संकष्ट चतुर्थी च्या दिवशी श्री गणेशांना अर्पण करावा. तर यामुळे तूंमची कोणत्याही प्रकारची धन संबंधित कोणतीही समस्या असो ती नक्कीच पूर्ण होईल. हाती घेतलेल्या कार्यात सफलता अवश्य मिळेल.

मित्रांनो अशा पद्धतीने संकष्टी दिवशी आपण आपल्या गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचा हा निवेद्य दाखवला आणि त्याचबरोबर त्यांची मनापासून पूजाअर्चा या दिवशी केली तर यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचा आशीर्वाद ही आपल्या सोबत कायम राहील.

मित्रांनो श्री गणेश हे विग्नहर्ता आहेत त्यांच्या कृपेने जीवनातील सर्व विघ्न दूर होतात. तर मित्रानो धन प्राप्ती साठी मनोकामना पूर्ती साठी किंवा कार्य सिद्धी साठी संकष्टी चतुर्थी च्या दिवशी वरील उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment