मित्रांनो,वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर गोचर करून अन्य राशी किंवा नक्षत्रात स्थिर होत असतो. तर काही वेळा ग्रहांच्या मार्गी होण्याने सुद्धा विविध राजयोग जुळून येत असतात. जेव्हा दोन किंवा त्याहून अधिक ग्रह एकाच वेळी त्यांच्या गोचर कक्षेत समोरासमोर येतात तेव्हा त्यातून राजयोगांची निर्मिती होत असते. काही राजयोग ठराविक अंतराने आपोआप जुळून येतात तर काहींसाठी मात्र अत्यंत दुर्मिळ वेळ- काळ जुळून यावा लागतो.
असाच एक दुर्मिळ राजयोग म्हणजे गजलक्ष्मी योग हा ऑगस्ट महिन्यात तयार होत आहे. शुक्र ग्रह कर्क राशीत वक्री होत असल्याने गजलक्ष्मी राजयोग जुळून येणार आहे ज्यामुळे कर्क सहित अन्य तीन राशींना अपार धनसंपत्ती मिळण्याचे योग आहेत. या नशीबवान राशींमध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का हे पाहूया.
तूळ रास
शुक्र ग्रह कर्क राशीत वक्री होताच तुमच्या राशीत त्याचा प्रभाव कर्म भावी म्हणजेच सहाव्या स्थानी अधिक असणार आहे. यामुळे तुम्हाला करिअर मध्ये प्रचंड मोठी झेप घेण्याची संधी लाभू शकते. तसेच भूतकाळात केलेल्या कामाचे अडकून पडलेले पेमेंट किंवा त्यामुळे जोडून येणारे नवे काम अशा मार्गानी प्रचंड धनलाभ सुद्धा होऊ शकतो.
तुमचे सर्व फायदे हे तुमच्या कर्मावर आधारित आहेत. केवळ धन- संपत्तीच नव्हे तर मानसिक स्थैर्य मिळवून देण्याचे काम सुद्धा हा राजयोग करू शकतो. तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तूळ राशीच्या मंडळींना येत्या महिन्याभरात काहीवेळा आपल्या नियमित स्वभावाला छेद देणारे काही निर्णय घ्यावे लागू शकतात.
मिथुन रास
गजलक्ष्मी राजयोग हा मिथुन राशीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतो कारण हा राजयोग व शुक्राचा प्रभाव आपल्या राशीच्या धन स्थानी तयार होत आहे. तुम्हाला बचतीची व त्याहूनही अधिक गुंतवणुकीची संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्यामुळे अनेक वाद, कौटुंबिक कलह दूर सारता येतील. तुमच्या बोलण्या- चालण्याच्या पद्धतीत सुधारणा दिसून येऊ शकते. यामुळे तुमच्याकडे लोकांचे लक्ष वेधले जाईल. जे लोक संवाद- संभाषण संबंधित क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा खूप मोठा फायदा ठरू शकतो.
कन्या रास
तुमच्यासाठी सुद्धा गजलक्ष्मी राजयोग लाभदायक सिद्ध होऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे गजलख्मी राजयोग आपल्या राशीच्या इनकम स्थानी तयार होत आहे. यामुळे तुम्हाला तूळ व मिथुन या दोन्ही राशींना मिळणारे फायदे एकत्रित मिळू शकतात. तुम्हाला करिअरमध्येही प्रगती करता येऊ शकते तसेच त्यातून प्रचंड कमाईची सुद्धा संधी आहे.
याशिवाय तुम्हाला वैवाहिक सौख्य लाभण्याची चिन्हे आहेत. जर तुम्ही संततीप्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर येणारा महिन्याभराचा कालावधी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन येऊ शकतो.