फक्त मोदक आणि दूर्वाच नाही ‘हे’ प्रभावी स्तोत्र आणि मंत्रही आहेत बाप्पाला प्रिय; नियमित पठण केल्यास बाप्पा देईल भरपूर आशीर्वाद

संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. येत्या ७ सप्टेंबर २०२४ रोजी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. वर्षभर लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतात. बाप्पाच्या आगमनासाठी चविष्ट पदार्थ, सुंदर सजावट, ढोल-ताशाचा गजर या सगळ्याची जय्यत तयारी केली जाते. दररोज बाप्पाला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो, सुंदर आरत्या म्हटल्या जातात.

दूर्वा, फुले अर्पण केली जातात. पण, या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याचदा अनेकांकडून बाप्पाला आवडणारी ही एक गोष्ट करायची राहून जाते. खरे तर, बाप्पाच्या आगमनामुळे घरात प्रचंड लगबग सुरू असते. त्यामुळे अनेकदा बाप्पासमोर काही वेळ शांत बसून, त्याच्या आवडच्या स्तोत्रांचे पठण आणि मंत्रांचा जप करता येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बाप्पाचे तीन प्रभावशाली अशी सोपी स्तोत्रे आणि दोन मंत्र सांगणार आहोत; ज्यांच्या पठणाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करील.

 

बाप्पाची प्रभावी तीन स्तोत्रे

खालील तिन्ही स्तोत्रे बाप्पाला खूप प्रिय असून, यापैकी तुम्ही कोणत्याही एका स्तोत्राचे नियमित पठण करू शकता.

 

१. श्रीगणपत्यथर्वशीर्ष

 

श्रीगणपत्यथर्वशीर्ष बाप्पाला खूप प्रिय आहे. श्रीगणपत्यथर्वशीर्षाच्या पठणाने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि व्यक्तीला आयुष्य चांगले आरोग्य मिळून, बुद्धी आणि समृद्धी प्राप्त होते, असे म्हटले जाते.

 

२. संकटनाशन गणेश स्तोत्र

 

असे म्हटले जाते की, या स्तोत्राच्या पठणाने आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. व्यक्तीला आयुष्यात अनेक सुख-सुविधा प्राप्त होतात.

 

३. गणेश चालिसा

 

गणेश चालिसाच्या पठणाने कुटुंबात सुख-समृद्धी येते. कामातील अडथळे दूर होतात. आर्थिक परिस्थितीही चांगली राहते, असे म्हटले जाते.

 

बाप्पाचे दोन मंत्र

बाप्पाचे हे दोन्ही मंत्र अत्यंत प्रभावी आहेत. शक्य असल्यास दररोज १०८ वेळा यापैकी एका मंत्राचा जप नक्की करा.

 

गणेश गायत्री मंत्र

ॐ एकदन्ताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्॥

 

गणेश बीज मंत्र

ओम गं गणपतये नमः॥

Leave a Comment