रविवारी करा हे सोपे उपाय, काही दिवसांतच चमकेल नशीब!

प्रत्येकच जण आयुष्यात सुखशांती येण्यासाठी प्रयत्न करत असतो. आठवड्यातला प्रत्येक दिवस प्रत्येक ग्रहाला पर्यायाने त्या त्या देवतेच्या उपासनेशी जोडला गेला आहे. त्यानुसार ज्योतिषशास्त्रात रविवारी काही सुर्य उपासनेविषयी उपाय सुचवण्यात आले आहेत. या उपयांनी काही दिवसातच तुमचे नशीब चमकू शकेल. सनातन धर्मात रविवारला भगवान सुर्य देवाची दिवस मानला गेला आहे. प्रत्येक व्यक्ती कुंडलीमध्ये सूर्याचा प्रभाव फार शुभ मानला जातो. त्यामुळे रविवारी काही उपाय केल्याने सूर्य देव प्रसन्न होतात.

सकाळी सुर्याला अर्घ्य द्या. रोज सकाळ आंघोळ करून उगवत्या सुर्याला अर्घ्य देणं फार शुभ मानलं जातं. हे अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करा. त्यासोबत लाल फूल, अक्षता आणि खडीसाखर वहा. त्यानंतर अर्घ्य अर्पण करा.रविवारी झाडू खरेदी करणं फार शुभ मानलं जातं. बाजारातून ३ झाडू खरेदी करा. सोमवारी ते झाडू मंदिरात दान करा. यामुळे तुमच्यावर भगवान नारायणाची कृपा बरसेल.

प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी वडाच्या झाडाच्या तुटलेल्या पानावर तुमची इच्छा लिहा आणि वाहत्या पाण्यात सोडून द्या. प्रत्येक रविवारी हा उपाय केल्याने तुमची इच्छा पूर्ण होईल. आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. यासाठी रविवारी कणकेचा चौमुखी दिवा बनवून पिंपळाच्या झाडाखाली ठेवा.यामुळे तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल.

रविवारी बाभळीच्या झाडाला दूध अर्पण करून धन आणि वैभव परत मिळवू शकतात. यासाठी रविवारी रात्री झोपण्याआधी एक ग्लास दूध उशाशी घेऊन ठेवा. सकाळी उठल्यावर हे दूध बाभळीच्या झाडाच्या मूळाशी घाला.

Leave a Comment