श्री स्वामी समर्थ यांचा जप कसा करावा?

मित्रांनो आज आपण जप कसा करायचा? का करायचा? कोणता करायचा? व जपमाळ करायची योग्य पद्धत कोणती? याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपल्या इष्ट देवतेच्या उपासनेत जपाचे स्थान महत्त्वाचे आहे. जपाच्या जपमाळेत 108 मणी असतात पण अधून मधून आपल्या मनात असा विचार येतो की 108 पेक्षा कमी किंवा जास्त का नसतात? पण आपल्या ऋषीमुनींनी याबाबत फारच विचार करून त्याची संख्या ठरवली असणार. जगात प्रमुख 27 नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्राचे चार चरण जोतिष शास्त्रात प्रसिद्ध आहेत. 27 नक्षत्र व चार चरण यांचा गुणाकार 108 येतो.

त्याचबरोबर 12 राशी व 9 ग्रह याचेही गुणानुफल 108 होतात. त्यामुळे या संख्येला महत्व आहे. तसेच भगवान शिव आणि विष्णूंची नावेही 108 आहे. अशा प्रकारे अवघे विश्व हे 108 संख्येत सीमित असल्याने जपमाळेत सुद्धा 108 मणी असतात.

त्याचबरोबर माळेच्या मण्याने किती जप झाला, याचा साधारणतः हिशोब लक्षात येतो. व दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अंगठा आणि बोट याचा मण्यांशी होणारा स्पर्शाने एक विलक्षण ऊर्जा तयार होते. त्यामुळे आपले हृदय चक्र प्रभावी होत जाते आणि आपले मन एकाग्र होते. म्हणून जपासाठी माळेचा वापर करावा.

आपण जपासाठी तुळशीची माळ, स्फटिकाची माळ, रुद्राक्षाची माळ किंवा सुवर्णमाळ सुद्धा वापरू शकतो. पण रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ समजली जाते. याचे कारण म्हणजे, गुरुचरित्र ह्या ग्रंथात रुद्राक्षाच्या माळेच महत्व दिलेल आहे.

मित्रांनो, आता जप करताना, माळ कशी पकडावी? कोणत्या बोटांनी ओढावी? याची आपण माहिती घेऊया. जप करताना उजव्या हातात माळ घेऊन आपल्या उजव्या हाताचा अंगठा व करंगळी शेजारील बोट म्हणजे अनामिका.

या दोन्हीच्या चिमटीवर माळ पकडावी व मधल्या बोटाने अगदी सावकाश व पूर्ण श्रध्देने एक एक मनी ओढत श्री स्वामी समर्थ हा जप करावा. मणी ओढताना आपल्या हाताच्या तर्जणीचा वापर करू नये. कारण तर्जनी गुरूंचे बोट आहे. गुरूंच्या बोटाचा स्पर्श मणी ओढताना करायचा नसतो.

एक एक मणी ओढुन 108 मणी संपले की मेरूमणी येतो. जप करताना कधीही मेरूमणी ओलाडायचा नसतो. मेरूमणीच्या जवळ आल्या नंतर माळ अंगठ्यावर घ्यावी. उलट फिरवावी व त्यापासून एक एक मणी ओढत जप करावा, म्हणजेचं जेवढ्या माळा आपण जप करू तेवढ्या वेळा मेरूमणी जवळ आल्यानंतर माळ फिरवून घ्यावी.

आता मेरूमणी का ओलाडायचा नाही. जप माळ संबंधी आणखी महत्वाची माहिती म्हणजे जपाची माळ कधीही गळ्यात घालू नये. गळ्यात घातलेली माळ कधीही जपाला वापरू नये.

मित्रांनो जपाची माळ कधीही जमिनीवर ठेऊ नये. जपाची माळ खुंटीला किंवा एखाद्या खिळ्याला अडकवून ठेऊ नये. जपाची माळ एका डब्यात घालून देवघरात पूजेच्या साहित्यात ठेवावी. आता काहीजण म्हणतील की आमच्याकडे जपाची माळ नाही. आम्ही जप कसा करायचा? याचही साधं आणि सोप उत्तर आहे.

ते म्हणजे तुम्ही जप करण्यासाठी स्वामींसमोर बसा व एक उदबत्ती लावा व ती उदबत्ती संपेपर्यंत अनन्य भावाने स्वामींचा जप करा. तुमची हाक स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल. तर मित्रानो जप का करावा? जो कोणता करावा? जप कसा करावा? आणि जपमाळ कशा प्रकारे ओढावी? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment