Friday, September 29, 2023
Homeराशी-भविष्यऑगस्टमध्ये सिंह राशीत दुर्मिळ राजयोग! या राशींचे लोकं होणार मालामाल

ऑगस्टमध्ये सिंह राशीत दुर्मिळ राजयोग! या राशींचे लोकं होणार मालामाल

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपली स्थिती एका ठराविक वेळेनंतर बदलत असते. यापैकी शनि ग्रह हा सर्वात धिम्या गतीने म्हणजे अडीच वर्षांने तर चंद्र सर्वात कमी सव्वा दिवसात आपली रासी बदलतो.

तर सूर्य हा दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्य गोचरला सूर्य संक्रांती असंही म्हणतात.

सध्या सूर्य कर्क राशीत असून 16 ऑगस्टला तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत बुध ग्रह विराजमान आहे. सूर्य सिंह राशीत असतानाच चंद्र हा कर्क राशीत असणार आहे. तर शुक्र सूर्यापासून 12 व्या घरात आहे. अशा स्थितीत कुंडलीत अतिशय दुर्मिळ आणि शुभदायी वाशी राजयोग तयार होतं आहे. याच वेळी चंद्र आणि मंगळाचा संयोगदेखील आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील वाशी राजयोग 5 राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे.

मेष राशी
मेष राशीच्या लोकांना वाशी राजयोग फलदायी सिद्ध होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रासाठी हा लाभदायक असणार आहे. परदेशात प्रवास घडणार आहे. धार्मिक कार्यात मनं रमणार आहे. एखादी तिर्थयात्रेला तुम्ही जाऊ शकता. मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे.

सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांना वाशी राजयोग अतिशय फलदायी ठरणार आहे. तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास या काळात दिसणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. प्रगती आणि यशाचे मार्गाकडे तुमची वाटचाल सुरु होईल. उत्पन्नात वाढ होणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे.

तूळ राशी
या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग आहेत. तुमच्या अनेक वर्षांच्या इच्छा आता सहज पूर्ण होणार आहे. सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. आर्थिक लाभामुळे तुमचं मनोबल वाढणार आहे. वाशी राजयोगामुळे तुमचे अच्छ दिन सुरु होणार आहे.

वृश्चिक राशी
वाशी राजयोगामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना यशाचे मार्ग मोकळे होणार आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात आनंद असणार आहे. करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होणार आहे.

धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी वाशी राजयोग अतिशय शुभ ठरणार आहे. तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळणार आहे. आनंदी आनंद वातावरण असणार आहे. वैवाहिक जीवनात समाधान आणि आनंद असणार आहे. तुम्हाला या दिवसांमध्ये अनेक फायदे होणार आहेत.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन