26 जुलै अधिक महिन्यातील मोठी अष्टमी घरात इथे लावा आठ दिवे घरात बरकत राहील!

मित्रांनो 18 जुलैपासून अधिक श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि 16 ऑगस्ट पर्यंत हा अधिक श्रावण असणार आहे आणि त्यानंतर मग निज श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. म्हणजेच यावर्षी दोन महिन्यांचा श्रावण महिना असणार आहे. तर अधिक श्रावण महिना हा तीन वर्षानंतर येत असतो. त्यामुळे अधिक महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

या अधिक महिन्यांमध्ये अनेक पूजा विधी, व्रत वैकल्ये देखील केले जातात. तसेच दानधर्म, दीपदान याला खूपच महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर 26 जुलै बुधवारच्या दिवशी अधिक महिन्यातील मोठी अष्टमी आहे आणि तुम्ही संध्याकाळी घरामध्ये आठ दिवे या ठिकाणी लावायचे आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये बरकत राहणार आहे. पैशाची टंचाई अजिबात भासणार नाही.

सदैव लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सात वाजण्याच्या सुमारास हे आठ दिवे घरामध्ये लावायचे आहे. तर तुम्हाला गव्हाचे पीठ घेऊन त्याची कणिक बनवून आठ दिवे करायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप घालायचे आहे आणि नंतर त्यामध्ये कापसाची वात घालून हे आठ दिवे एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि नंतर दिवा अगरबत्ती केल्यानंतर हे दिवे देखील तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत.

हे दिवे तुम्हाला देवघरासमोर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सात वाजण्याच्या सुमारास ठेवायचे आहेत आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांची आरती महादेवाची आरती तुम्हाला म्हणायचे आहे. आरती जर येत नसेल तर तुम्ही फक्त या दिव्यांनी देवघरांमध्ये ओवाळायचे आहे आणि ताट तसेच देवघरासमोर ठेवायचे आहे आणि नंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन आपण जसे नैवेद्याला गोलाकार फिरवतो तसेच आपण त्या दिव्यांच्या ताटाला ते पाणी गोलाकार फिरवायचे आहे.

रात्रभर तसेच आपणाला ते दिव्यांचे ताट तसेच रात्रभर ठेवायचे आहे आणि नंतर सकाळी म्हणजेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे दिवे एखाद्या नदीमध्ये विसर्जित करायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या गाईला खाऊ घालायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आज बुधवारच्या दिवशी या अधिक महिन्यातील मोठ्या अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी कणकीचे दिवे आठ बनवून तुम्ही अवश्य आपल्या देवघरांमध्ये प्रज्वलित करायचे आहे.

यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास राहील. लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तसेच घरामध्ये बरकत कायम राहील.

Leave a Comment