मित्रांनो अधिक श्रावण महिन्याला सुरुवात ही १८ जुलैपासून झालेली आहे. अधिक महिना हा तीन वर्षानंतर येत असतो. त्यामुळे अधिक महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेलेले आहे. आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींची सेवेकरी भक्त आहेत. स्वामी आपल्या प्रत्येक अडचणीतून संकटातून आपणाला सुखरूप बाहेर काढतात असा विश्वास प्रत्येक भक्ताला सेवेकराला असतोच.
तर बऱ्याच जणांना वेळेअभावी स्वामींची सेवा करता येत नाही. म्हणजेच केंद्रामध्ये मठांमध्ये जाऊन स्वामींची सेवा करता येत नाही तर आपण घरामधून स्वामींची सेवा करीत असतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामींची सात दिवसांची अशी एक स्वामी सेवा सांगणार आहे ही जर स्वामी सेवा तुम्ही अधिक महिन्यात केली तर यामुळे तुमच्या ज्या काही मनातील इच्छा असतील ज्या अपूर्ण राहिलेले आहेत या सर्व पूर्ण होणार आहेत.
तर स्वामींची सात दिवसाची स्वामी सेवा तुम्हाला अधिक महिन्यात करायची आहे. फक्त सात दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. तसेच तुम्ही श्रावण महिन्यामध्ये देखील सात दिवसांची ही स्वामींची सेवा केला तरीही चालेल. तरी या सेवेमध्ये नेमके काय करायचे आहे? तर मी तुम्हाला चार गोष्टी सांगते म्हणजेच या चार गोष्टींपैकी तुम्ही कोणतीही एक गोष्ट सात दिवस करायचे आहे.
म्हणजेच तुम्ही सात दिवस गुरुचरित्र पारायण करू शकता. म्हणजेच सात दिवसांमध्ये तुमचे गुरुचरित्र पारायण होईल. तर 21 अध्याय त्यामध्ये असतात दररोज जर तुम्ही तीन अध्याय वाचले तर सात दिवसांमध्ये तुमचे गुरुचरित्र पारायण होते. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही स्वामी समर्थांचे श्री स्वामी सारामृत हे पारायण देखील करू शकता. यामध्ये देखील 21 अध्याय असतात तर तुम्ही दररोज तीन अध्याय वाचले तर सात दिवसांमध्ये स्वामींची ही सेवा पूर्ण होऊ शकते.
जर तुम्हाला सारांमृत पारायण देखील करणे शक्य नाही तर तुम्ही दररोज एक वेळा स्वामींचा तारक मंत्र बोलू शकता. म्हणजे दररोज एक वेळेस तारक मंत्र तुम्हाला उत्तर असे तुम्ही सात दिवस देखील करू शकता. जर तुम्हाला तारक मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही दररोज 21 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. म्हणजे दररोज 21 माळ स्वामी समर्थांचा मंत्र जप तुम्हाला सात दिवसांपर्यंत करायचा आहे.
तर या वरील चार गोष्टींपैकी तुम्ही कोणतीही एक गोष्ट या अधिक श्रावण महिन्यामध्ये करायचे आहे. म्हणजेच स्वामींची सात दिवसांची सेवा तुम्ही करू शकता. जर तुम्ही न चुकता दररोज सात दिवस सलग स्वामींची जर ही सेवा केला तर यामुळे स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या पाठीशी सदैव स्वामी राहतील. तर तुम्ही देखील ही स्वामींची सात दिवसांची सेवा अवश्य करा. तुम्हाला देखील स्वामींचे अनुभव येतील.