अधिक महिन्यात ‘या’ वस्तूजवळ लावा अखंडित दिवा लक्ष्मी घरात वास करेल!

मित्रांनो अधिक महिन्याची सुरुवात ही १८ जुलैपासून चालू झालेली आहे. अधिक श्रावण महिना हा तीन वर्षानंतर येत असतो. तर या अधिक श्रावणामध्ये अनेक प्रकारचे पूजा विधी देखील केले जातात. तसेच जावयांना वान देखील दिले जाते. तर मित्रांनो अधिक श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला या एका वस्तूजवळ अखंडित दिवा प्रज्वलित करायचा आहे. ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील.

लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील. तर ही वस्तू कोणती आहे याविषयी आपण आता सविस्तर जाणून घेऊयात. तर अधिक महिना हा 18 जुलैपासून सुरू झालेला आहे आणि तो 16 ऑगस्टपर्यंत असणार आहे. तर तुम्ही कोणत्याही दिवसांपासून दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो 16 ऑगस्ट पर्यंत तसाच आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे.

तर हा अखंडित दिवा जो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तो या वस्तू जवळ आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. ती वस्तू म्हणजेच शाळीग्राम. मित्रांनो शालिग्राम हे विष्णू देवांचे प्रतीक मानले गेलेले आहे. तर तुम्ही आपल्या देव्हाऱ्यामध्ये शालिग्रामच्या ठिकाणी म्हणजे शालिग्रामच्या जवळ अखंडित दिवा प्रज्वलित करायचा आहे.

तर तुमच्या देव्हाऱ्यामध्ये शालिग्राम नसेल तर तुम्ही तो खरेदी करून आणू शकता आणि शालिग्रामच्या शेजारी अखंडित दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर तुम्हाला शालिग्राम खरेदी करणे जमत नसेल तर तुम्ही विष्णू देवांच्या प्रतिमेसमोर अखंडित दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तुमच्या देवघरांमध्ये बाळकृष्णाची जरी मूर्ती असेल तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीपाशी तुम्ही अखंडित दिवा प्रज्वलित करायचा आहे.

हा दिवा तुम्हाला 16 ऑगस्टपर्यंत प्रज्वलित करायचा आहे. मित्रांनो यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आणि विष्णूदेव यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे तुम्ही देखील अधिक महिन्यांमध्ये अखंडित दिवा अवश्य प्रज्वलित करा. यामुळे धनधान्याची बरकत राहील. तसेच लक्ष्मीच्या सदैव वास आपल्या घरामध्ये राहील. तसेच मातेचा आशीर्वाद देखील आपणाला प्राप्त होईल. तर अधिक महिन्यांमध्ये शालिग्रामच्या शेजारी अखंडित दिवा अवश्य प्रज्वलित करा.

Leave a Comment