यंदाचे आठ श्रावणी सोमवार कोणत्या तारखेला येणार? कशी कराल पूजा?

मित्रांनो, शिवाचा अत्यंत आवडता महिना म्हणून श्रावण महिन्याकडे पाहिलं जातं. यंदाचा श्रावण अधिक मासाला घेऊन आल्याने हा श्रावण यंदा ५९ दिवसांचा असणार आहे. आज म्हणजेच २४ जुलै २०२३ रोजी श्रावणाचा पहिला सोमवार आहे.

श्रावणात सोमवारच्या दिवसाला अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे. शिवाचा आवडता महिना आणि शिवाला समर्पित दिवस असा संयोग येत असल्याने भक्त देवळात गर्दी करतात आणि आपल्या लाडक्या भोलेनाथाची पूजा मनोभावे करतात. यंदाच्या याच श्रावण महिन्यातले आठही सोमवार कोणत्या दिवशी येणार आहेत ते पाहूया.

या श्रावणात कधी येणार आठ सोमवार?
यंदाचा श्रावण १८ जुलै २०२३ रोजी सुरू झाला असून हा श्रावण १५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. अशात अधिक मासामुळे एकंदरीत आठ सोमवार भक्तांना शिवाची पूजा करण्यास मिळणार आहेत. पाहूया हे आठ सोमवार कोणत्या दिवशी येणार?

पहिला श्रावण सोमवार २४ जुलै
दुसरा श्रावण सोमवार ३१ जुलै
तीसरा श्रावण सोमवार ०७ ऑगस्ट
चौथा श्रावण सोमवार १४ ऑगस्ट
पाचवा श्रावण सोमवार २१ ऑगस्ट
सहावा श्रावण सोमवार २७ ऑगस्ट
सातवा श्रावण सोमवार ०४ सप्टेंबर
आठवा श्रावण सोमवार ११ सप्टेंबर

श्रावण सोमवारी कशी कराल पूजा?
सकाळी लवकर उठून, आंघोळ करून, स्वच्छ वस्त्रे घालावी. तुम्ही तुमच्या देवघरात किंवा देवळात शिवपूजा करू शकता. घरी शिवलिंग स्थापित करावे. शिवलिंगावर जलाभिषेक करावा. त्यानंतर पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक करावा आणि पुन्हा जलाभिषेक करावा. त्यानंतर शिवलिंगाला चंदन लावावं. मग शिवलिंगावर बेलपत्र, फुलं, अक्षता वाहाव्यात. शिवलिंगाला नैवेद्य दाखवावा. मग भगवान शंकराची आरती करावी आणि शिव चालिसाचं पठण करावं. तुम्ही शिवमंत्राचा जापही करू शकता.

Leave a Comment