आज श्रावण अधिक मासातील पहिला सोमवार, शुभ योगामुळे `या` राशींवर बरसणार भोलेनाथाची कृपा!

आज श्रावण अधिक मासातील पहिला सोमवार आहे. श्रावण महिना हा शंकर भगवान यांचा आवडता महिना आहे. तर सोमवार हा दिवस भोलेनाथाला समर्पित केला आहे. आजच्या सोमवारी अतिशय शुभ असे योग जुळून आले आहेत. रवियोग, शिवयोग आणि त्यात आज शिववास नंदीवर असतो. आजचा दिवस रुद्राभिषेकसाठी अत्यंत शुभ मानला जातो. आज भगवान भोलेनाथाची काही राशींवर विशेष कृपा बरसणार आहे.

मेष राशी
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम आहे. त्यांच्या नात्यामध्ये आज गोडवा वाढणार आहेत. वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असेल. कामाच्या ठिकाणीही मनं प्रसन्न असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. जुन्या आजारापासून मुक्तता मिळणार आहे.

वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांवर आज भोलेनाथाची विशेष कृपा असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. व्यवसायतही तुम्हाला फायदा होणार आहे. पोटाशी संबंधित समस्या नाहीशा होतील. प्रिय व्यक्तीसोबत खरेदीला जाण्याचा बेत ठरणार आहे.

कर्क राशी
आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन आला आहे. करिअरमध्ये आज तुम्हाला यश प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी प्रगतीमुळे तुमचं मनं आनंदी असणार आहे. नवविवाहित जोडप्यांसाठी आजचा दिवस एकदम खास असणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. घरात सुख समृद्धी नांदणार आहे.

कन्या राशी
आजचा दिवस कन्या राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. खास नातेवाईकाच्या भेटीमुळे मनं प्रसन्न असणार आहे. ऑफिसमध्ये बॉस तुमच्यावर प्रसन्न असणार आहेत. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे.

धनू राशी
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी उत्तम असणार आहे. एखाद्या खास व्यक्तीच्या आगमनाने घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंदी आनंद असणार आहे. व्यापारी वर्गासाठीही आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना आज तुमची इच्छा पूर्ण होणार आहे.

Leave a Comment