अधिक महिन्यामध्ये जावयाला कोणत्या शुभ दिवशी द्यावे वान?

मित्रांनो अधिक महिन्यांमध्ये जावयाला अनन्यसाधारण महत्व दिले जाते. म्हणजेच जावयाला अनेक वस्तू वान म्हणून दिल्या जातात. तसेच अनारसे देण्याची पद्धत देखील खूपच पूर्वीपासून चालत आलेली आहे. तर अधिक महिन्याला खूपच आपल्या हिंदू धर्मांमध्ये महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणजेच तीन वर्षांनी अधिक महिना येत असतो. तर अधिक महिन्यांमध्ये जावयाला कोणत्या शुभ दिवशी वान द्यायचे आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

तर अधिक महिन्यांमध्ये जावयाला घरी बोलावून त्यांना अनेक प्रकारचे वान दिले जातात. तर अनेक भेटवस्तू देखील देत असतात. तर तुम्ही जावयाला वान देणार असाल तर आपण कोणत्या दिवशी द्यायचे आहे म्हणजेच कोणत्या शुभ दिवशी जावयाला वान द्यावे याबद्दल आज जाणून घेणार आहोत.

तर अधिक महिन्यांमध्ये कृष्ण पक्ष आणि शुक्लपक्ष हे दोन पक्ष असतात. म्हणजेच पंधरा दिवसांचा कृष्ण पक्ष आणि पंधरा दिवसांचा शुक्ल पक्ष असतो आणि या दोन पक्षामध्ये काही शुभ दिवस असतात आणि या शुभ दिवशी तुम्ही जावयाला आपल्या घरी बोलवून वान द्यायचे आहे.

तर अधिक महिन्यांमध्ये चतुर्थी, पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, पौर्णिमा या दिवशी तुम्ही कोणत्याही दिवशी जावयाला घरी बोलावून वान देऊ शकता. म्हणजेच कृष्ण पक्षांमध्ये हे सर्व शुभ दिवस आणि शुक्लपक्ष मध्ये हे शुभ दिवस येत असतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही दिवशी आपल्या घरी जावयाला बोलावून जावयाला वान द्यायचे आहे.

तर तुम्ही देखील अधिक महिन्यांमध्ये आपल्या घरी आपल्या जावयाला बोलणार आहात आणि त्यांना वाण देणार असाल तर या शुभ दिवशी तुम्ही बोलावून जावयाला वान आवश्य द्यायचे आहे.

Leave a Comment