रोज स्वामींचा किती माळी जप करावा?

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त आहेत. ते अनेक मठामध्ये जाऊन स्वामींची सेवा, मंत्र जप हे करीतच असतात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वाक्य कायम भक्तांच्या मनी रुजलेले आहे. म्हणजेच प्रत्येक अडचणीतून, संकटातून स्वामी महाराज आपणाला बाहेर काढतील असा विश्वास हा प्रत्येक भक्ताला असतो. त्यामुळे सेवेकरी अगदी मनोभावे, श्रद्धेने स्वामींची सेवा करण्यात मग्न असतात.

स्वामींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असतात. म्हणजेच आपली जी अडचण आहे त्यानुसार आपणाला केंद्रांमध्ये सेवा सांगितली जाते आणि ही सेवा आपण करत असतो. तर मित्रांनो बरेच जण हे अगदी वेळेअभावी त्यांना स्वामींच्या मठांमध्ये किंवा केंद्रामध्ये जाणे शक्य होत नाही त्यामुळे घरी ते स्वामींच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर बसून अनेक स्वामींच्या सेवा किंवा मंत्र जप करीत असतात.

अनेक भक्तांना असा प्रश्न पडलेला असतो की, स्वामींचा मंत्र जप हा किती वेळा करावा? म्हणजे दररोज स्वामींचा मंत्र जप हा किती वेळा करणे गरजेचे आहे? तर मित्रांनो जर तुम्ही स्वामींचा दररोज मंत्र जप केला तर स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील. प्रत्येक अडचणीतून तुम्हाला बाहेर काढतीलच. परंतु तुम्ही दररोज स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामींचे मंत्र जप करणे गरजेचे आहे.

तसे तर स्वामींचा मंत्र जप हा दररोज 11 माळी करणे गरजेचे आहे. परंतु आपल्या वेळेअभावी जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही दररोज एक माळ तरी स्वामींचा मंत्र जप करणे गरजेचे आहे. दररोज जर तुम्ही स्वामीचा एक वेळा मंत्र जप केला तर स्वामी तुम्हाला तुमच्या प्रत्येक अडचणीतून नक्कीच बाहेर काढतील. म्हणजेच आपली दुःख, अडचणी हे स्वामींची होऊन जातील. स्वामी कायम तुमच्या पाठीशी उभे राहतील.

Leave a Comment