मित्रांनो, राशी आणि पत्रिकेनुसार नवरत्न धारण केल्यानं आयुष्यावर मोठा प्रभाव पडतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. अनेकजण रत्न तर वापरतात. पण, त्यांना अपेक्षित फायदा होत नाही. ही निराशा टाळण्यासाठी ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय कोणतेही रत्न वापरु नये. एकूण 84 रत्न असून त्यामधील 9 महत्त्वाची आहेत. रत्न धारण केल्यानं अडचणी कमी होतात. त्यांची पारख कशी करावी याच्या महत्त्वाच्या टिप्स त्यांनी दिल्या आहेत.
मेष लग्नाच्या जातकाला पोवळा, पुष्कराज, पाचू आणि हिरा चालत नाही असे गुरुजी सांगतात. प्रत्येक रत्न वेगळं असून ते परिधान करण्याचे शास्त्र असल्याची माहिती ते देतात. वृषभ , कन्या, मकर आणि मिथुन या राशीच्या जातकाने हे रत्न वापरू नये.
पुष्कराज हे गुरूचे रत्न मानले जाते. या रत्नाला धारण केल्याने सुख समृध्दी मिळते. या रत्नामुळे मनाच्या शांती बरोबरच भविष्यात येणारी संकटे कमी होतात. गुरु ग्रहामुळे विवाहात अडचण आली तर पुष्कराज रत्न धारण करण्यास सांगतात. त्याचबरोबर पोटाचे विकार असतील तर ते कमी होतात, अशी माहिती त्यांनी दिली.
‘रत्न चांगलं की वाईट हे फक्त सर्टिफिकेटमुळे ठरवू शकत नाही. सूर्यप्रकाशात रत्नाची पारख करावी. हाताच्या स्पर्शानं तसंच डोळ्यांनी रत्नाची पारख करता येते. या रत्नावर कोणता डाग किंवा खड्डे आहेत का हे पाहावं. सरावानं रत्नाची पारख करता येते,’ अशी माहिती त्यांनी दिली.