मित्रांनो 18 जुलैपासून अधिक श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि अधिक श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे पूजा विधी केले जातात. तसेच जावयाला देखील अनेक प्रकारचे वान दिले जाते. तर अधिक महिन्यांमध्ये व्रत उपवास हे देखील खूपच मोठ्या प्रमाणात केले जाते. तर आज मी तुम्हाला अधिक महिन्यांमध्ये एक असा मंत्र सांगणार आहे की या मंत्राचा जप जर तुम्ही रोज एक माळ जर केला तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील या संपून जाणार आहेत.
धन, पैसा याची कधीच कमतरता भासणार नाही. घरामध्ये बरकत राहील. तर अधिक महिना हा तीन वर्षातून एकदा येत असतो. म्हणजेच यावर्षी अधिक महिना आला आहे. म्हणजेच पुढच्या वर्षी अधिक महिना येणार नाही. तर तीन वर्षांनी अधिक महिना येत असतो. तर त्यामुळेच या अधिक महिन्याला खूपच महत्त्व प्राप्त झालेले आहे.
तर अधिक महिन्यांमध्ये आपण अनेक मंत्रजप केले तर यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम होत असतात. तर तुम्ही अधिक महिन्यांमध्ये रोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर देवपूजा आटपून घ्यायची आहे आणि या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे. तो मंत्र म्हणजे
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
या मंत्राचा जप जर तुम्ही दररोज एक माळ केला तर यामुळे तुम्हाला पैशाची चणचण भासणार नाही. तसेच भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमचे जीवन खूपच आनंदमय होईल. तर या मंत्राचा जर तुम्ही संपूर्ण अधिक महिन्यांमध्ये एक माळ करायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम नक्कीच तुम्हाला दिसून येतील.