आजपासून महिनाभर ‘या’ ४ राशी होऊ शकतात करोडपती!

चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणून आषाढ अमावास्या साजरी केली जाते. २०२३ मध्ये आषाढ अमावास्या सोमवारी येत असल्यामुळे ती सोमवती अमावास्या म्हणून साजरी केली जाणार आहे. यानुसार आज १७ जुलैला आषाढी/सोमवती/दीप/ गतहारी अमावस्या असणार आहे. तर उद्यापासून अधिक श्रावण महिना सुरु होत आहे. आजच्या दीप अमावास्येला तब्बल ५७ वर्षांनी एक अत्यंत अद्भुत योगायोग जुळून आला आहे.

५७ वर्षांपूर्वी या दिवशी सूर्य, बुध, राहू व केतू ज्या राशीत होते त्याच राशीत आज पुन्हा एकत्र आले आहेत. सूर्याचे तूळ राशीतील गोचर हे पुढील महिनाभर कायम असणार आहे त्यामुळेच महिन्याभरात चार अत्यंत भाग्यशाली राशींवर धनवर्षाव होण्याची शक्यता आहे. या राशींना कोणत्या रूपात धनप्राप्ती होऊन करोडपती व्हायची संधी आहे हे ही पाहूया..

मेष रास
सूर्य, बुध, राहू, केतू हे चारही ग्रह सध्या तूळ राशीत आहेत मात्र तरीही सूर्याचा प्रभाव मेष राशीच्या गोचर कुंडलीत पाचव्या स्थानी अधिक सक्रिय आहे. हे स्थान कर्म भावी मानले जाते. म्हणूनच येत्या महिन्याभरात मेष राशीच्या प्रयत्नांना भरघोस यश मिळू शकते. जर तुम्ही एखादे नवे काम सुरु करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आवश्यक पाऊले उचलण्याची हीच वेळ आहे. राजकारण व समाजकार्यात सक्रिय मंडळींना येत्या काळात प्रसिद्धी व पदप्राप्तीचे योग आहेत. सूर्याच्या आद्यशिर्वादाने तुमच्या वाणी व संवाद कौशल्यात सुद्धा सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात.

वृषभ रास
शनी साहाय्यकारी असल्याने मेहनत, सातत्य आणि चिकाटी ठेवलीत तर नक्कीच लाभदायक होईल. सत्याचा मार्ग सोडू नका. विद्यार्थीवर्गाने वेळेचे उत्तम नियोजन करणे अतिशय आवश्यक असेल. अन्यथा मेहनत वाया जाईल. शनी बुधाचा शुभ योग कामकाजात नियोजनबद्धता देईल. त्यात सातत्य राखणे मात्र आपली जबाबदारी आहे. कुटुंबात, जोडीदारासह वाद निर्माण होतील. शब्दाने शब्द न वाढवणे हिताचे ठरेल. आपण जर वाणीवर नियंत्रण ठेवले तर येत्या काळात तुम्हला माता लक्ष्मीचा मोठा आशीर्वाद लाभू शकतो.

तूळ रास
भाग्य आणि दशम स्थानातील रवी, बुधाचे भ्रमण विशेष लाभकारक ठरेल. गुरुबल चांगले आहेच. नोकरी व्यवसायात मोठी झेप घ्याल. त्यात आर्थिकदृष्ट्या चांगला लाभ होण्याचे योग आहेत. विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे फळ उत्तम मिळेल. जोडीदाराच्या समस्या सोडवताना नातेवाईकांची मदत होईल. गुंतवणूकदारांना कमीतकमी तोटा सहन करावा लागेल. विवाहोत्सुक मंडळींना लवकरच उत्तम स्थळ चालून येऊ शकते.

वृश्चिक रास
नोकरी व्यवसायात महिन्याच्या अखेरीस आर्थिक लाभ होतील. शुभ वार्ता समजतील. विद्यार्थीवर्गाने कायम जागरूक राहावे. चिकाटी गरजेची ! स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी शोधकार्य सुरू ठेवावे. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात नाव गाजवेल. सहकारी वर्गाची साथ सोबत उत्तम मिळेल. तुम्हाला सोने, वाहन व प्रॉपर्टी यांच्या गुंतवणुकीचा योग आहे.

Leave a Comment