Friday, September 22, 2023
Homeराशी-भविष्यअधिक मासमध्ये आपल्या राशीनुसार करा दान, संपूर्ण कुटुंबाला मिळते पुण्य!

अधिक मासमध्ये आपल्या राशीनुसार करा दान, संपूर्ण कुटुंबाला मिळते पुण्य!

अधिकमास सुरू झाला आहे. या अधिकमासाला पुरुषोत्तम मास किंवा मलमास पण म्हणतात. या दरम्यान परंपरा आहे की या दरम्यान लोक गरजवंतांना धन किंवा धान्याचे दान केले तर ते शुभ असते. नाशिकचे ज्योतिषाचार्य पं. सुशांत धर्माधिकारी यांच्यानुसार या मासात दान आणि पुण्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे दान किंवा पुण्य केले ते दुप्पट तर होते आणि ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला फायदेशीर ठरते.

अधिक मासात व्रत, उपवास आणि पूजा आणि दान करण्याचे अत्याधिक महत्त्व आहे. आपल्या कुवतीप्रमाणे व्यक्तीने दान केले पाहिजे. तसेच हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की रात्रीचे दान केला नाही पाहिजे. काही स्थितीत रात्री दान केले जाऊ शकते. जसे यज्ञ, विवाह, संक्रांती, चंद्र किंवा सूर्यग्रहण. जर या महिन्यात राशीनुसार दान केले तर यामुळे कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहांच्या दोषांना शांत केले जाऊ शकते.

मेष- चांदी, लाल कपड़े, डाळिंब, मालपोहा, तूप, केळी, सोने, तांबे आणि गहू

वृषभ- मोती, वाहन, सफेद वस्त्र, मालपोहा, मावा, चांदी, सोने, साखर, गाय, हिरे, तांदुळ, केळी

मिथुन- बांगड्या, सिंदूर, साड़ी, मूर्तीसाठी छत्र, पन्ना, मूगाची डाळ, सोने, तेल, केळी, मालपोहा, काशाची भांडी

कर्क- मावा, दूध, साखर, मालपोहा,तांदुळ, मोती, चांदी, सफेद कपड़े, पाणीपोईत माठ, तेल, सोने, गाय

सिंह- धार्मिक पुस्तकें, लाल कपड़े, सोने, चांदी, तांबे, पितळ, गहू, डाळिंब सफरचंद, मसूर, माणिक्य

कन्या- तेल, केले, सफरचंद, मुगाची डाळ, सोने, छत्र, गोशाळेत धन आणि गवत

तुला- साखर, सफेद कपड़े, तांदुळ, केले, मालपोहा आणि मावा

वृश्चिक- मौसंबी , डाळिंब, तूप, गहू, लाल कपड़े, तांबे

धनु-लाकडाचे सामान, पिवळे कपड़े, तीळ, धान्य, दूध, चण्याची डाळ, तूप,

मकर आणि कुंभ राशी- तेल, औषध, केळी, अवजार, निळे कपड़े, लोहा, मौसमी फल

मीन- चण्याची डाळ, तूप, दूध, पिवळे कपड़े आणि दूधाने बनवलेली मिठाई,

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन