घरात करा हा एक प्रभावी उपाय मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण

मित्राला प्रत्येकाचे मनात काही न काही इच्छा, आकांक्षा, मनोकामना असतात. त्या पूर्ण व्हाव्यात अशी देखील प्रत्येकाची इच्छा असते. परंतु काही कारणांमुळे आपल्या मनातील इच्छा या मनातच राहून जातात. त्या कधीच पूर्ण होऊ शकत नाही म्हणून आपण त्या पूर्ण करण्याचा देखील प्रयत्न करीत नाही. आपणाला जे हवे ते मिळत नसल्याने आपले कशातही मन लागत नाही.

काम करण्याची देखील इच्छा राहत नाही. तुमच्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्यात, तुम्हाला जे हवे ते मिळावे यासाठी मी तुम्हाला आज एक प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या ज्या काही मनात इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होऊन तुम्हाला जे जे हवे ते सर्व काही मिळून जाईल.

या उपायासाठी तुम्हाला एका नारळाची आवश्यकता आहे. पूजेचा एक नारळ आणायचा आहे. हा नारळ सोलायचा नाही कारण जेव्हा आपण नारळ फोडत असतो त्यावेळेस आपण तो नारळ सोलून घेतो. परंतु हा नारळ आपल्याला फोडायचा नाहीये म्हणून तो सोलूनदेखील घ्यायचा नाही.

नारळ तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे. देवघरात पुरेशी जागा नसेल तर तुम्ही देवघराच्या साईडला, कुठेही आजूबाजूला जागा असेल त्या ठिकाणी ठेवायचे आहे. मांडी घालून बसून त्या नारळाची हळदीकुंकू, फुले, अक्षता वाहून पूजा करायची आहे. अगरबत्ती, दिवा लावायचा आहे. नंतर तो नारळ तुम्हाला दोन्ही हातात घेऊन मनोभावे नमस्कार करून आपली जी काही इच्छा मनात असेल ही इच्छा व्यक्त करायची आहे. बोलायची आहे. नंतर तो नारळ तसाच देव घरात ठेवायचा आहे.

असे तुम्हाला सलग सात दिवस करायचे आहे. आठव्या दिवशी हा नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये वाहुन द्यायचा आहे. हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवसापासून चालू केला तरी चालेल. परंतु सात दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा प्रभावशाली उपाय केल्याने तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या नक्की पूर्ण होतील.

Leave a Comment