मित्रांनो, श्रावणात आपल्या संस्कृती, परंपरा, सण-उत्सव यांची अगदी रेलचेल असते. वातावरणात थंडावा आलेला असतो. जिथे पाहावे, तिथे धरणी माता नवचैतन्याने न्हाऊन निघत असते. नदी, नाले, तलाव दुथडी भरून वाहत असतात. पाण्याची अल्लड धाव मनमोहून टाकणारी असते. प्राणी, पक्षी अवनीच्या या नवरुपामुळे आनंदी झालेले असतात. पावसाच्या शिडकाव्यामुळे हिरवाईची चादर पसरलेली असते. यांसारखी अनेक वैशिष्ट्ये श्रावणाची सांगता येतील. याशिवाय महादेव शिवशंकरालाही हा महिना अत्यंत प्रिय असल्याचे सांगितले जाते.
आणि त्याचबरोबर मित्रांनो या श्रावणात कोण कोणत्या सेवा कराव्या, कोणत्या उपायांनी विशेष लाभ मिळेल चला जाणून घ्या.
त्याचबरोबर प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहिली पाहिजे आणि श्रावण महिन्यात श्री नवनाथ भक्तीसार, सुलभ भागवत,श्री गुरुचरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र या ग्रंथाचे पारायण करावे आणि मित्रांनो श्रावण मासातील सोमवारी भगवान शंकराची मनोभावे पूजा करावी, बेल तसेच शंकरांना प्रिय अशा वस्तू त्यांना अर्पण कराव्या आणि दान धर्म करावे,
शनिदोषापासून मुक्तता होते. या महिन्यात शिवपूजा केल्याने अविवाहित लोकांनाच इच्छित जीवनसाथी प्राप्त होतो तसेच या महिन्यात सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात. केवळ पाणी अर्पण करून आपण आपल्या कुंडली मधील अनेक दोष दूर करू शकतात.
मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार पितृ दोष दूर करण्यासाठी हा महिना खूप महत्वाचा आहे. शिवलिंगावर केवळ जल अर्पण केल्यास पितृ दोष आणि याशिवाय काळ सर्प दोष यातुन सुटका होते. मित्रांनो या महिन्यात, काळ सर्प दोष कायद्याने सोडवून अधिक फायदा होतो. त्याचबरोबर या महिन्यात केल्या गेलेल्या छोट्या उपायाने पितृ दोषातून मुक्तता होते. शनिदोष किंवा पितृदोष ग्रस्त असलेल्या व्यक्तीने श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगाला पाणी अर्पण करावे, असे केल्याने महादेव आपल्या भक्तांच्या अशुभ प्रभाव दूर करतात. शिवलिंगाला पाणी अर्पण करतांना रुद्राष्टक स्तोत्रांचे पठण करावे.
आणि त्याचबरोबर मित्रांनो या श्रावण महिन्यात व्रत वैकल्य करावे आणि मांसाहार पूर्णपणे टाळावा आणि मित्रांनो भगवान शिव यांना दूध खूप प्रिय आहे. असे मान्यता आहे की, महादेवाने समुद्रातील मंथनाच्या वेळी विष प्राशन केले तेव्हा त्याचे शरीर विषामुळे पेटून उठले होते. त्यांना असह्य वेदाना होऊ लागल्या होत्या. तेव्हा त्यांच्या शरीराचा दाह शांत करण्यासाठी देवांनी त्यांना दूध ग्रहण करण्याची विनंती केली. दूध प्यायल्यानंतर महादेवाच्या शरारातील दाह शांत झाला आणि तेव्हापासून महादेवाला दूध खूप प्रिय आहे आणि त्याचबरोबर रुईची फुले महादेवाला खूप प्रिय आहेत. रुई पुष्प अर्पण केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात.
मित्रांनो भगवान शिव यांना कानेरचे फूल देखील खूप प्रिय आहे. असे मानले जाते की जर हे फूल संपूर्ण श्रावणात महादेवाला पूजेमध्ये अर्पण केले गेले तर भक्तांची इच्छा नक्की पूर्ण होते आणि याशिवाय श्रावण महिन्यात शास्त्रानुसार सोमवारी तीन प्रकारचे व्रत करतात. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष. सोमवार व्रताची विधी सर्व व्रतांप्रमाणेच असते. या व्रताची सुरूवात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून केली जाते. श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात देवी पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते. श्रावणी सोमवारी देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची रीघ लागलेली असते.
आणि मित्रांनो महादेव शिवशंकरावर या दिवशी जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मुग आणि चौथ्या सोमवारी जव शिवामूठ म्हणून वाहण्याची पद्धत आहे. श्रावण महिन्यात पाचवा सोमवार आल्यास शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.