स्वामी महाराजांची सेवा करताना नक्की करा हे उपाय!

मित्रांनो श्री स्वामी समर्थांच्या सेवेकरांची स्वामींवर अपार श्रद्धा असते. नकारात्मकता दूर करण्यासाठी स्वामींची सेवा केली जाते.स्वामीभक्त दुःख, भिती, चिंता घालवण्यासाठी स्वामींच्या पुढे नतमस्तक होतात. आपण रोज स्वामींची उपासना करतो पूजा करतो मनोभावे प्रार्थना करतो पण ह्या सेवेमध्ये कुठे तरी काही तरी राहीले आहे आपण स्वामींच्या सेवेमध्ये काहीतरी कमी पडतोय असे वाटत असते. काही तरी चुकत आहे.

आपण पूजा करताना आपल्याकडून काही तरी राहिले असेल आणि त्यामुळे आपल्याला स्वामींच्या पूजेचे फळ मिळत नाहीए असे आपल्याला वाटत राहते. तशी तर आपण स्वामींची कोणतीही पूजा मनोभावे केली तर आपणाला स्वामींचे आशीर्वाद हे मिळतच असतात.

आपल्याला पूजेचे फळ हे मिळतेच. परंतु स्वामींची पूजा करत असताना किंवा उपासना करत असताना काही नियम असतात ते नियम आपल्याला पाळावे लागतात. स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत. ते सर्वशक्तीमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत. परमहंस आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ॐकारातील पहिला स्वर ‘अ’कार, म्हणजे शेषशायी विष्णू भगवान आहेत.

मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही. रागावर सुद्धा त्यांचे नियंत्रण आहे. स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाहीत. त्यांच्या दृष्प्रवृत्तीचे व्यवहार ते सहन करतात. कोप झाल्यास सर्व विश्वाचाच संहार होईल म्हणून स्वामी रागावत नाहीत. तर अपराधांना क्षमा करतात. स्वामींची कृपा उदंड व त्याच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे.

आज आपण अश्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्या रोजच्या आपल्या स्वामी पूजनामध्ये करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला स्वामी भक्तीचे फळ मिळणारच.ह्या ३ गोष्टी जरी आपण केल्या तरी आपली सेवा सार्थ होईल व आपल्याला स्वामींच्या सेवेचे फळ आपल्याला मिळेल. जर आपण नवीन सेवेकरी असाल म्हणजे नुकतीच सेवा करणे सुरु केली असेल तर तुम्ही ह्या गोष्टी फक्त स्वामी सेवेमध्ये करा. दररोज संध्यकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करावी समजा

सकाळी ७:३० वाजता किंवा संध्यकाळची एक वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावि. स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत ह्या अध्याचे अध्ययन करावे. अध्ययन करताना दररोज ३ अध्यायन वाचावेत. कारण त्यात २१ अध्यायने असतात जेणेकरून तुम्हाला एक आठवड्यासाठी अध्यायने होतील व पुढील आठव्यात पुन्हा नव्याने सुरु करू शकाल. हे वाचून झाल्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणावा.

तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ ह्या नामाचे ११ माळी जप करावा. हे न चुकता रोज करावे. आपण जिथे देवघरात बसतो त्या ठिकाणी देवाजवळ सर्वप्रथ दिवा लावावा व अगरबत्ती लावावी जेणेकरून वातावरण प्रसन्न होऊन जाते व आपण स्वामींची पूजा अगदी प्रसन्न मानाने करू शकाल. तसेच एका ग्लास मध्ये पाणी ठेवावे आणि आपली पूजा झाल्यानंतर आपण ते पाणी सर्व घरातल्या लोकांना द्यावे. तसेच अगरबत्तीचा रक्षा आपनाला तसेच आपल्या घरातील लोकांना लावावी.

अश्या प्रकारे तुम्ही दररोज स्वामींची पूजा करावी. आपल्या स्वामींच्या पूजनाचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून आपण दररोजच्या सेवेमध्ये ह्या ३ गोष्टी नक्की करा तुमच्यावरती स्वामी नक्की प्रसन्न होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment