बाळाचे नाक, छाती घरघर करत असेल तर करा हा खास घरगुती उपाय!

मित्रांनो, आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्दी, खोकल्याचा त्रास हा प्रत्येकाला सतावत आहे. आपण बऱ्याच प्रकारची महागडी औषधे घेतो. तसेच डॉक्टरांचा सल्ला देखील घे. परंतु सर्दी खोकल्याने आपल्याला खूपच त्रास सहन करावा लागतो. मित्रांनो लहान बाळांमध्ये देखील सर्दी, खोकला, कफ या समस्या आपणाला पाहायला मिळतात. छातीत आवाज येणे हे सर्दी खोकल्यामुळे होत असते. मित्रांनो आज मी तुम्हाला सहा ते एक वर्षाच्या बाळाला जर सर्दी, खोकला तसेच कफ झाला असेल तर यावरती कोणता घरगुती उपाय करायचा आहे हे सांगणार आहे.

हा उपाय जर तुम्ही केला तर बाळाची सर्दी, खोकला पूर्णपणे निघून जाईल. मित्रांनो लहान बाळांना सर्दी, खोकला हा त्रास झाल्यानंतर आपणाला ही बेचैन होते. आपलेही कशातच लक्ष लागत नाही. तर मित्रांनो हा घरगुती उपाय जर तुम्ही केला तर यामुळे बाळाची सर्दी, खोकला पूर्णपणे निघून जाईल आणि बाळाला कोणत्याच प्रकारचा मग त्रास सहन करावा लागणार नाही.

मित्रांनो बाळंतिणीने जर दररोज चार-पाच पाने जर तुळशीची खाल्ली तर बाळाला सर्दी खोकल्याचा त्रास होत नाही. मित्रांनो तुम्ही तुमच्या रूममध्ये स्टीमर लावून देखील ठेवू शकता. ज्यामुळे बाळाला सर्दी खोकल्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. स्टीमर लावल्याने त्याची वाफ ही पूर्णपणे आपल्या रूममध्ये पसरेल आणि त्यामुळे त्रास थोडा फार कमी होईल. मित्रांनो सर्दी, खोकल्यावर आपल्याला कोणता घरगुती उपाय करता येईल या विषयी आपण माहिती जाणून घेऊयात.

तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला मोहरीचे तेल थोडं गरम करायच आहे आणि त्यामध्ये लसूण आणि ओवा टाकायचा आहे आणि हे तेल तुम्हाला गाळून घ्यायच आहे आणि हे तेल थोडसं गार झाल्यानंतर तुम्हाला बाळाच्या छातीवर आणि पाठीवर मालिश करायचा आहे. मित्रांनो हे तेल कोमटच घ्या. या मालिशमुळे बाळाला जो काही कफ झालेला आहे तो कफ पातळ होण्यास मदत होईल.

आणि मग हा कफ बाळाच्या शी किंवा उलटी द्वारे बाहेर पडेल. तसेच मित्रांनो तुम्ही लसूण आणि ओवा तव्यामध्ये थोडाफार भाजून घ्यायचा आहे आणि त्याची एका कापडामध्ये पुरचुंडी बांधायची आहे आणि बाळाच्या छातीवर आणि पाठीवर या पुरचुंडीने शेक द्यायचा आहे. कपड्याने तुम्हाला हा शेक द्यायचा आहे. बाळाला चटका बसनार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. याचा वास देखील तुम्ही आपल्या बाळाला देऊ शकता. ज्यामुळे श्वसनलिकेतील म्युकस हा मोकळा होण्यास मदत होईल.. छातीमध्ये घरघर करत असेल तसेच नाक गच्च झाल असेल तर हा उपाय खूपच फायदेशीर ठरतो.

तसेच मित्रांनो दोन महिन्यांच्या पुढची जी काही बाळ असतील म्हणजे ज्यांना तुम्ही गुटी चालू केली असेल तर अशा बाळांच्या गुटी मध्ये तुम्ही जायफळाचा वापर आणि वेखंडाचा वापर करायचा आहे. जास्तीत जास्त चार-पाच वेढे द्यायचे आहेत. बाळ जर सात-आठ महिन्याचे असेल तरीदेखील चार पाच वेढे द्यायचे आहेत. जास्तही वेढे घ्यायचे नाहीत.

जायफळ हे खूपच गरम असते. तर जर तीन महिन्याचे बाळ असेल तर तुम्ही तीनच वेडे घ्यायचे आहेत. बाळ जर दोन महिन्याचे असेल तर दोनच वेडे घ्यायचे आहेत. जर बाळ चार महिन्याचे असेल तर चारच वेडे घ्यायचे आहेत म्हणजेच तुम्ही गुटीमध्ये त्या त्या महिन्यानुसार जायफळ आणि वेखंड याचा समावेश करायचा आहे. तसेच मित्रांनो तुम्ही जायफळ आणि वेखंडाची पेस्ट करून देखील ही पेस्ट तुम्ही बाळाच्या छातीवर, कपाळावर लावू शकता.

तर मित्रांनो जर बाळाला गुटी पचत नसेल तर तुम्ही जायफळ आणि वेखंडाची पेस्ट करून तुम्ही छातीवर आणि बाळाच्या कपाळावर लावू शकता आणि जर बाळाला गुटी पचत असेल तर तुम्ही जायफळ आणि वेखंडाचा वापर तुम्ही गुटीमध्ये करू शकता. कपाळावर ही पेस्ट लावल्याने बाळाच्या नाकाला त्याचा वास देखील जाऊ शकतो. त्यामुळे म्युकस मोकळा होण्यास मदत होते. आपलं जसं सर्दीने डोकं दुखतं त्याचप्रमाणे बाळांना सर्दीमुळे अस्वस्थता तसेच डोक्यात दुखणे हा त्रास त्यांचा कमी होण्यास मदत होते.

जेव्हा मित्रांनो तुम्हाला बाळाला सर्दी किंवा नाक ओल झालेलं तुम्हाला जाणवेल त्यावेळेस तुम्ही मोहरीचे तेल तसेच शेख देणे तसेच गुटीमध्ये जायफळ वेखंड दिलेत तर हा त्रास कमी होण्यास मदत होईल. तसेच मित्रांनो तुम्हाला जेव्हा वाटेल की बाळाला दूध पिणे देखील खूपच कठीण झालेला आहे म्हणजेच भरपूर कफ झालेला आहे त्यावेळेस तुम्ही नेबोलायझरचा वापर करू शकता. जोपर्यंत बाळाची सर्दी जात नाही तोपर्यंत हे घरगुती उपाय तुम्ही करू शकता.

तसेच मित्रांनो तुम्हाला जेव्हा बाळाला सर्दी झालेली आहे असे जाणवेल त्यावेळेस तुम्ही आपल्या रूम मधील फॅन बंद करायचा आहे. यामुळे बाळाचे सर्दी कमी होण्यास मदत होईल. तसेच मित्रांनो आपणाला नाकात घालण्यासाठी ड्रॉप्स देखील उपलब्ध होतील. या ड्रॉप्सचा देखील तुम्ही वापर करू शकता. बेबीसाठी ड्रॉप्स तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होते. हे ड्रॉप्स तुम्ही बाळांच्या नाकपुड्यामध्ये दोन दोन थेंब टाकायचे आहेत.

ज्यामुळे जर बाळाचे नाक गच्च झाले असेल ते मोकळे होण्यास मदत होईल. म्हणजेच जो काही म्युकस आहे तो पातळ होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपल्या लहान बाळांना सर्दी, खोकला किंवा कफ झालेला असेल तर असे घरगुती उपाय करून देखील बाळाला होणारा त्रास कमी करू शकता.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment