अमावस्येला करा हे प्रभावशाली उपाय, होतील आर्थिक अडचणी दूर!

मित्रांनो 16 जुलै रविवारी अमावस्या आहे. तर या अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही अशा काही गोष्टी केल्या तर यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या नक्कीच सुटणार आहेत. इतरही अनेक समस्याच निवारण होऊ शकत. कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी चला जाणून घेऊया. अमावस्याला दानधर्माचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेलं आहे आणि या दिवशी काही उपाय केल्यास व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात.

त्याचबरोबर पैशांची अडचणही मिटते. त्यामध्ये जर समजा तुम्हाला नोकरीची समस्या असेल तर ज्योतिष शास्त्रानुसार नोकरीशी संबंधित समस्या असल्यास तुम्ही काय करायचंय तर अमावस्येच्या दिवशी ओंकार या मंत्राचा जप करायचा आहे आणि मित्रांनो ओंकारचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय काळ्या कुत्र्याला रात्री मोहरीचे तेल लावलेली भाकरी खाऊ घालायची त्यामुळे जीवनातील सर्व अडचणी आणि करिअरमधील अडथळे दूर होतात. लक्षात घ्या हा ग्रहांशी संबंधित उपाय आहे. जर तुमचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही हा उपाय करून बघू शकता.

ज्योतिष शास्त्रानुसारच आणखीन एक उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे अमावस्येच्या दिवशी मौन व्रत धारण करणे. अमावस्येला जर तुम्ही मौन व्रत धारण केलं तर हजार गाई दान केल्याचं पुण्य मिळते असं म्हटलं जातं. मौन व्रत धारण करायचं म्हणजे ईश्वराची साधना करायची. मनातले मनात ईश्वराच्या नामाचा जप करायचा. संसारिक गोष्टीतनं लक्ष काढून घ्यायचं आणि तो संपूर्ण दिवस ईश्वर साधनेमध्ये व्यतित करायचा असा त्याचा अर्थ आहे. तरच तुम्हाला हजार गाईदान केल्याचा पुण्य मिळू शकतात.

त्याचबरोबर त्याचबरोबर या दिवशी पिंपळवृक्षाची पूजा केली जाते आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा सुद्धा या दिवशी केली तर मनोकामनापूर्ती होते असे म्हटले जातात. पूजेनंतर पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा अवश्य घालाव्या आणि नतमस्तक होऊन आपल्या जीवनातील समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करावी.

आता बघूया आर्थिक सुबत्ता येण्यासाठी म्हणजे आपल्याकडे आर्थिक संपन्नता यावी यासाठी ज्योतिषशास्त्राने काय उपाय सांगितलेत ते. तर अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला सुती धागा 108 प्रदक्षिणा मारून गुंडाळा. असं केल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक बरकत येते.

त्याचबरोबर तुमच्या घरातल्या मुलांनाही दीर्घायुष्याची प्राप्ती होते. त्यामुळे संपत्ती येते आणि संकट दूर होतात. माणसाच्या आयुष्यात सर्व प्रयत्न करूनही पैसा जेव्हा येत नाही किंवा पैसा या न त्या कारणाने खर्च होतो तेव्हा ज्योतिष शास्त्रातले हे काही उपाय करून बघायला हरकत नाही.

अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुळशीची पूजा सुद्धा नक्की तुळशीला पाणी घाला फुल अर्पण करा आणि त्यानंतर धूपदीप दाखवून भक्ती भावानी श्रीहरी विष्णूंच्या कोणत्याही एका मंत्राचा जप तुम्ही जवळ बसून 108 वेळा करू शकता. तुमच्या जीवनातील कशाही प्रकारची संकट असली तरी त्यामुळे ती दूर होतील. तर वरील सांगितलेले उपाय आहेत यातला कुठलाही एक उपाय जो तुम्ही करू शकता.

Leave a Comment