18 जुलै अधिक श्रावण; महिनाभर कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये?

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर 18 जुलैपासून अधिक श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि 16 ऑगस्टला हा अधिक महिना संपणार आहे. अधिक श्रावण महिन्यामध्ये आपण सर्व नियमांचे पालन हे करायचेच आहे आणि नीज श्रावण महिन्यातील तुम्ही सोमवारची व्रत करू शकता.

तरी श्रावण महिन्यामध्ये अशी काही आपल्याला कामे करायचे आहेत ज्यामुळे आपल्याला त्याचा लाभ होईल. म्हणजेच अधिक श्रावण महिन्यामध्ये दान करण्याला विशेष खूपच महत्त्व आहे. म्हणजेच जास्तीत जास्त दान करून आपण अधिक पुण्याची प्राप्ती करू शकतो. त्यामुळे तुम्ही अधिक महिन्यांमध्ये दान करायचे आहे. तसेच तुम्ही आर्थिक गुंतवणूक करायचे आहे. तसेच धार्मिक पूजा विधी, पाठ, स्त्रोत पठण हे नक्कीच करायचे आहे. यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते.

तसेच अधिक महिन्यांमध्ये भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महामात्य तसेच राम कथेचे पठण तसेच विष्णू सहस्त्रनाम याचे पठण तुम्ही आवश्यक करायचे आहे. यामुळे आपणाला विष्णू देवांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच या महिन्यांमध्ये देवांची मनोभावे पूजा करायचे आहे. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप दररोज 108 वेळा करायचे आहे. तसेच या अधिक महिन्यांमध्ये अन्न फक्त एक वेळेस घ्यायचे आहे.

अधिक महिन्यानत दीप दानाला खूपच महत्त्व आहे. तसेच या महिन्यांमध्ये दान आणि दक्षिण दिशेचे कार्य करणे खूपच पुण्याचे मानले जाते. यामुळे आपले सर्व प्रकारचे त्रास दूर होतात. आपल्याला यामुळे शुभ फळ देखील प्राप्त होते. तसेच गहू, तांदूळ, तीळ, वाटाणा, काकडी, केळी, दूध, तूप, दही, आंबा, जिरे, चिंच, सुपारी, फणस, मेथी या पदार्थांचे तुम्ही सेवन करायचे आहे.

तसेच अधिक महिन्यांमध्ये प्रवास करणे तसेच जी भागीदाराची कामे असतील ही कामे तसेच बियाणे पेरणी, झाडे लावणे, सेवा करणे ही कामे तुम्ही अवश्य करायचे आहेत. त्याप्रमाणे तुम्ही लग्नकार्य किंवा साखरपुडा अजिबात करायची नाही. तसेच अधिक मासामध्ये विवाह असेल, नामकरण असेल, श्राद्ध गृहप्रवेश यांसारखी देखील शुभ कामे टाळायची आहेत.

या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूर राहावे. मांस, मध, तांदळाचा कोंडा, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळे अन्न, मद्यपान करू नये.

त्याचप्रमाणे मित्रांनो अधिक महिन्यांमध्ये तुम्ही ग्रह खरेदी तसेच वास्तू खरेदी किंवा कपडे, दागिने, घर, दुकान इत्यादी कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक अजिबात करायची नाही. जर तुम्ही दागिने खरेदी करणार असाल तर ते तुम्ही ज्योतिषांच्या सल्ल्यानेच करायचे आहेत. तसेच तुम्ही इतर ठिकाणी देवदर्शनाला न जाता आपल्या घरामध्येच असणाऱ्या देवी देवतांची अगदी मनोभावेने श्रद्धेने पूजा करायचे आहे.

तसेच या महिन्यांमध्ये तुम्ही घरामध्ये भांडण किंवा अपशब्द अजिबात वापरू नयेत. तसेच घरगुती देखील वाद टाळायचे आहेत. तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे अधिक महिन्यांमध्ये या गोष्टींकडे तुम्ही अवश्य लक्ष द्या. यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी किंवा संकटे यांचा सामना आपल्याला करावा लागणार नाही.

Leave a Comment